शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! जवानाच्या पत्नीवर दिराकडून तब्बल 18 वर्षे बलात्कार; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 16:49 IST

Crime News : मुख्य आरोपी आपल्या लहान भावाच्या पत्नीवर गेल्या 18 वर्षांपासून बलात्कार करत होता.

नवी दिल्ली - देशामध्ये अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका जवानाच्या पत्नीवर दिराकडून तब्बल 18 वर्षे बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमध्ये हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे महिलेच्या पतीला देखील याची माहिती होती. तिने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती पतीला दिली असता त्याने आपल्या मोठ्या भावाचीच बाजू घेतली. तब्बल होती 18 वर्षांनंतर आता हा भयंकर प्रकार समोर आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आपल्या लहान भावाच्या पत्नीवर गेल्या 18 वर्षांपासून बलात्कार करत होता. महिलेचा पती सैन्यात कार्यरत आहे. जेव्हा महिलेने पतीला त्याच्या मोठ्या भावाच्या म्हणजेच दिराच्या भयंकर कृत्याबद्दल सांगितलं तेव्हा पतीने पत्नीची साथ देण्याऐवजी आपल्या मोठ्या भावाचीच बाजू घेतली. घरात राहायचे असेल तर तुला हे सर्व सहन करावेच लागेल, असं पतीने पत्नीला सांगितल्याचं समोर आलं आहे.

पीडित महिलेने हिंमत दाखवत पती आणि दिराविरुद्ध थाटीपूर पोलीस ठाण्यात बलात्कार व गैरकृत्याला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2003 मध्ये आरोपी दिराने पहिल्यांदा अत्याचार केल्याची घटना घडली होती. तिचे तेव्हा नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी ती अवघ्या 19 वर्षांची होती. घरच्या प्रतिष्ठेसाठी ती शांत राहिली होती. तिने घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला. त्यावर तिला पतीने साथ दिली नाही. महिलेने अनेक वेळा विरोध करायचा प्रयत्न केला त्यावर दिराने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. 

दिराने रोज तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा कसून तपास करून आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल करून बलात्कार करणाऱ्या दिराला अटक केली आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, ही महिला भिंड येथील रहिवासी आहे. तिचा पती लष्करात आहे. महिलेचा दीर गेल्या अनेक वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश