शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

सावधान! KBC च्या नावाने घातला 90 लाखांचा गंडा; 'असा' ओढायचा जाळ्यात, 4 वर्षांनी पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 11:37 IST

Crime News : 90 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणात जन्मजय दास (44 ) याला ओडिशाहून अटक केली आहे.

नवी दिल्ली - सीआयडीने (CID) तब्बल 90 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणात आरोपीला ओडिशात अटक केली आहे. आरोपीने कौन बनेगा करोडपतीच्या जॅकपॉटचं बक्षीस देण्याच्या नावाखाली हा गुन्हा केला. हा गुन्हा 2018 मध्ये सीआयडी रांचीच्या सायबर सेलमध्ये दाखल झाला होता. यानंतर आता आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 90 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणात जन्मजय दास (44 ) याला ओडिशाहून अटक केली आहे. आरोपीने यापूर्वी छत्तीसगड आणि देहरादून येथेही सायबर फसवणूक केली आहे. 

आरोपीकडून एक मोबाईल आणि आधार कार्ड जप्त करण्यात आलं आहे. सायबर एसपी कार्तिक एसने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या केंद्रपाडा येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. जॅकपॉटच्या नावाने जवळपास 90 लाखांचा गंडा घातला. आरोपी या गुन्ह्याअंतर्गत विविध व्हर्च्युअल नंबरवरुन लोकांना इंटरनेट कॉल करीत होता आणि त्यांना केबीसी जॅकपॉटमध्ये विजेता होण्याचं आश्वासन दिलं जात होतं. केबीसीमध्ये पुढे खेळण्यासाठी आणि अधिक पैसे जिंकण्यासाठी लोकांना प्रश्न विचारत होता. 

जिंकलेल्या पैसे मिळवण्यासाठी जीएसटी आणि अन्य चार्जच्या नावाखाली विविध बँक खात्यात धोका देऊन पैसे जमा करण्यास सांगत होता. या प्रकरणात सीआयडीने आवाहन केलं आहे की, कोणत्याही अज्ञात मोबाईल नंबरवरुन केबीसी जॅकपॉटच्या नावाखाली कॉल आल्यास स्वत:चे खासगी माहिती शेअर करू नये. केबीसीच्या नावाखाली कोणतेही कॉल आले तर केबीसीचं ऑफिस किंवा वेबसाईटवर जाऊन खात्री करू घ्या. लॉटरीच्या नावाखाली येणाऱ्या कॉलच्या जाळ्यात अडकू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Kaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपतीCrime Newsगुन्हेगारी