शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : जास्तीचे भाडे नाकारल्याने महिलेला अश्लील संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 10:53 IST

Crime News: जास्तीचे भाडे दिले नाही म्हणून उबेर टॅक्सीचा दलाल म्हणून काम करणाऱ्या तरुणाने महिला प्रवाशासह तिच्या पतीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अश्लील व्हिडीओ, फोटो तसेच संदेश पाठविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : जास्तीचे भाडे दिले नाही म्हणून उबेर टॅक्सीचा दलाल म्हणून काम करणाऱ्या तरुणाने महिला प्रवाशासह तिच्या पतीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अश्लील व्हिडीओ, फोटो तसेच संदेश पाठविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उबेर टॅक्सी दलाल उत्सवकुमार प्रमोद शुक्ला (१८) याला बिहार येथून अटक केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जुलै रोजी त्यांचे पती आणि सासऱ्यांना बोरिवली येथे बैठकीला जायचे असल्याने त्यांनी उबेर बुक करण्यासाठी चारच्या सुमारास शुक्लाला फोन केला. मात्र त्याने टॅक्सी बुक केली नाही. त्यानंतर सहाच्या सुमारास फोन करून उबेर बुक केल्याचे सांगितले. याचदरम्यान उबेर टॅक्सीने बोरिवलीहून घरी परतत असताना, शुक्लाने दिलेल्या चालकाने जास्तीच्या भाड्याची मागणी केली. तक्रारदार यांच्या पतीने नकार देत, दुसऱ्या टॅक्सीने घर गाठले. याच रागातून ४ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास शुक्लाने महिलेला कॉल करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच वेगवेगळ्या मोबाइलवरून फोन करून तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲपद्वारे अश्लील व्हिडिओ, फोटो, संदेश पाठवले. तक्रारदार यांनी तत्काळ एल. टी. मार्ग पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. एलटी मार्ग पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तपासात, आरोपी बिहार येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला बिहारमधून अटक केली.  

छत्तीसगडमधून एकाला अटकमलबार हिल येथील महिलेला २५ जून रोजी फेसबुकवर अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर अश्लील संदेश, फोटो पाठविण्यास सुरुवात केली. त्यांनी मलबार हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तांत्रिक तपासात, आरोपी छत्तीसगडमध्ये असल्याचे उघड आले. त्यानुसार, छत्तीसगडच्या बिलासपूर  जिल्ह्यातून सुमीतकुमार सुरेश सिंग (२४) याला शनिवारी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी