शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : फसवणुकीच्या गुन्ह्यात पाकिस्तानी चोरटे सक्रिय, आभासी चलनात परताव्याचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 09:30 IST

Crime News: बिटकाॅइनसह वेगवेगळ्या आभासी चलनांमध्ये सध्या गुंतवणूक वाढली आहे. या चलनांमध्ये गुंतवणुकीवर मोठा फायदा असल्याचे सांगितले जात असल्याने त्याच्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे.

- विवेक भुसे पुणे : बिटकाॅइनसह वेगवेगळ्या आभासी चलनांमध्ये सध्या गुंतवणूक वाढली आहे. या चलनांमध्ये गुंतवणुकीवर मोठा फायदा असल्याचे सांगितले जात असल्याने त्याच्याकडे लोकांचा ओढा वाढला आहे. मात्र, त्याचवेळी जादा परतावा देण्याच्या आमिषाने चलन विकून देतो, असे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे त्यात आता पाकिस्तानी सायबर चोरटेही सक्रिय झाल्याचे सायबर पोलिसांच्या तपासांत निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांकडे अशा दररोज आठ ते दहा तक्रारी येऊ लागल्या आहेत.सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले की हे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असतात. ज्या बँक खात्यात पैसे घेतात, त्या आधारे तपास करण्यात येत आहे. आम्ही केलेल्या तपासांत दोन ठिकाणी प्रथमच पाकिस्तानी आयपी ॲड्रेस आढळून आले आहेत. आभासी चलनाला भारतात अजून अधिकृत मान्यता देण्यात आली नाही. असे असले तरी आता त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार होऊ लागला आहे. अनेक भारतीय आभासी चलनही बाजारात आले आहेत. यातील बहुतांश व्यवहार हे इंस्ट्राग्रॉम, फेसबुकद्वारे होत असतात. सायबर चोरटे सोशल मीडियाद्वारे लोकांशी संपर्क साधतात. वेगवेगळ्या ॲपद्वारे बिटकाॅइन, एम कॅप, इथर, इथोरिअम अशा आभासी चलनात दररोज वाढ होत असल्याचे दर्शवितात. आभासी चलनाचा चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून हे चलन खरेदी करतात. मात्र, एकदा त्यांच्या खात्यावरून हे चलन घेतले की त्यांचा परतावा परत देत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने नायजेरियन सायबर चोरट्यांचा समावेश आहे.

दहा हजारांचे एक लाख करून देण्याचे आमिषआभासी चलनात दहा हजार रुपये गुंतविल्यास एक-दोन महिन्यांत एक लाख रुपयांपर्यंत त्यांची किंमत वाढू शकते, असे सांगितले जाते. त्यांना ॲपवर गुंतवणूक करायला भाग पाडले जाते. त्यानंतर ते ॲप बंद होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी