शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून ट्रिपल मर्डर! आई वडिलांसह मुलीला 'त्याने' रस्त्यात गाठलं अन् केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:11 IST

Crime News : प्रेमात वेड्या झालेल्या प्रियकराने धारदार शस्त्राने वार करून तरुणी आणि तिच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमात अपयशी ठरल्याने एका तरुणाने ट्रिपल मर्डर केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रेमात वेड्या झालेल्या प्रियकराने धारदार शस्त्राने वार करून तरुणी आणि तिच्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केली. त्याचवेळी पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. खोराबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगंज भागातील ही घटना आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, खोराबार पोलीस स्टेशन हद्दीतील रायगंज गावात राहणारे गामा निषाद हे बंगला चौकात कुटुंबासोबत राहत होते. तर गामा यांचे मोठे भाऊ रामा निषाद रायगंजमध्ये राहतात. रामा निषाद यांच्या मोठ्या मुलीचे लग्न होत असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी कुटुंबात एक समारंभ होणार होता. त्याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गामा रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पत्नी संजू आणि मुलगी प्रीतीसह पायी जात होते.

घरापासून सुमारे 800 मीटर अंतरावर वाटेत हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने संपूर्ण कुटुंबाला घेरले. गामा यांना काही समजू शकेल त्याआधीच हल्लेखोराने प्रीतीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याचवेळी मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांवरही धारदार शस्त्राने हल्ला केला. धारदार शस्त्राने जखमी झालेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एसएसपी डॉ विपिन टांडा, एसपी सिटी कृष्ण कुमार विश्नोई, सीओ कैन्ट श्यामदेव घटनास्थळी पोहोचले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. एसएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी अलोक पासवान याला अटक करण्यात आली आहे. तो संतकबीर नगर येथील राहणारा आहे आणि खोराबार मध्ये आपल्या मामा महेंद्र पासवान यांच्या घरी राहत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी