शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: विजेच्या टॉवरवरील तारांची चोरी करताना लागला गळफास, एकाचा मृत्यू, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 17:16 IST

Crime News: उच्चदाब विद्युत वाहिनी टॉवरवरील विजेच्या तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला.

अहमदनगर -  उच्चदाब विद्युत वाहिनी टॉवरवरील विजेच्या तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला. योगेश रावसाहेब विघे ( वय २० वर्ष, रा. पिलानीवस्ती चिकलठाण ता . राहुरी ) असे मयताचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  यामध्ये एक विधीसंघर्षीत बालकाचाही समावेश आहे. इनोव्हा कारसह (क्र.एम.एच.२०ए.जी.५२५८ ) पोलीसांनी टेम्पोही (क्र.एम.एच.१७ बी.डी.०२९७ ) जप्त केला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात रविवारी (दि.६)पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. विशाल राजेंद्र पंडीत (वय १८) , आदित्य अनिल सोनवणे (वय २०) दोघेही रा. शिंदोडी ता. संगमनेर , संकेत सुभाष दातीर ( वय २६, रा. प्रिंप्रिलौकी ता.संगमनेर ) व सरफराज इक्बाल शेख (रा. रामगड ता. श्रीरामपुर) व एक विधीसंघर्षीत बालक अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , योगेश रावसाहेब विघे यास विशाल आणि आदित्य हे शिंदोडी येथे घेऊन आले. या सर्वांनी पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान शिंदोंडी शिवारात उच्चदाब विद्युत वाहून नेणाऱ्या टॉवरवर टॉवरची उंची जास्त आहे असे माहिती असताना देखील योगेश विघे यास चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने विजेच्या टॉवरवर चढवले. त्यास टॉवरवरील अॅल्युमिनियम धातुच्या विजेच्या तारा कापण्यास सांगितले . त्याच्याकडून तारा कापून घेतल्या आणि त्याच दरम्यान तारा कापत असताना तार तुटतेवेळी योगेश याच्या पोटास बांधलेल्या दोरीने गळफास बसल्याने योगेशची हालचाल पूर्ण बंद झाली.

त्यानंतर वरील पाच जणांनी इन्होवा कारमधून योगेशला औषध उपचारासाठी लोणी येथील पी.एम.टी हॉस्पीटल मध्ये नेत असताना लोणी पोलिसांना वाहनाचा संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली. योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले . याप्रकरणी रावसाहेब सुखदेव विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी चौघांसह एका विधीसंघर्षीत बालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत .

टॅग्स :electricityवीजCrime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर