शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

Crime News: तामिळनाडूत चंडीगडची पुनरावृत्ती, हॉस्टेलमधील तरुणींचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि...,

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 16:38 IST

Crime News: चेन्नईमध्ये एका प्रायव्हेय कॉलेजमधील विद्यार्थिनीला हॉस्टेलमदील तरुणींचे असेच फोटो आणि व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे.

चेन्नई - पंजाबमधील मोहालीमधील एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधील हॉस्टेलमध्ये एक विद्यार्थिनी इतर विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून सिमला येथील आपल्या बॉयफ्रेंडला पाठवत असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर सदर विद्यार्थिनीसह तिच्या मित्रांच्या मुसक्या आवळल्या होत्या. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच आता तामिळनाडूमधील मदुराईमध्ये अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. 

चेन्नईमध्ये एका प्रायव्हेय कॉलेजमधील विद्यार्थिनीला हॉस्टेलमदील तरुणींचे असेच फोटो आणि व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. मदुराईच्या एका प्रायव्हेट कॉलेजमधील एक तरुणी इतर मुलींसोबत अण्णानगरमधील एका हॉस्टेलमध्ये राहते. या विद्यार्थिनीने इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ गुपचूपपणे शूट करून पाठवल्याचा आरोप केला जात आहे.

या विद्यार्थिनीच्या हालचालींवर एका तरुणीला शंका आली. तिने याबाबतची माहिती हॉस्टेलच्या वॉर्डनला दिली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून अॅक्टिव्ह मोडमध्ये आलेल्या हॉस्टेलच्या वॉर्डनने तरुणीचा फोन घेऊन चेक करण्यास सुरुवात केली, तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या फोनमध्ये तरुणींचे आक्षेपार्ह फोटो सापडले. 

त्यानंतर वॉर्डनने याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, या तरुणीने हे व्हिडीओ आणि आक्षेपार्ह फोटो तिच्या मित्राला पाठवल्याचे समोर आले आहे. तिचा मित्र असलेला अशोक हा क्लीनिक चालवतो. अशोकचं तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेलं आहे.

दरम्यान, तरुणीने आरोप केला की, अशोक हा तिच्यावर तरुणींचे आंघोळ करतानाचे आणि कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवण्यासाठी दबाव आणायचा. पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीसह तिच्या मित्राला अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडू