शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Crime News: पैशाचा वाद नडला; अल्पवयीन मुलाच्या मदतीने ‘संतोष’चा काटा काढला, आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 20:27 IST

Crime News: पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्याने व्यक्तीच्या डोक्यावर काठीने तसेच सिमेंटच्या दगडाने जबर मारहाण करुन त्याची हत्या केली. ही घटना १२ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास येणोरा परिसरात असलेल्या माता मंदिराजवळील जयसिंग चंदेल यांच्या शेतातील बंड्यात घडली.

- चैतन्य जोशीवर्धा - पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्याने व्यक्तीच्या डोक्यावर काठीने तसेच सिमेंटच्या दगडाने जबर मारहाण करुन त्याची हत्या केली. ही घटना १२ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास येणोरा परिसरात असलेल्या माता मंदिराजवळील जयसिंग चंदेल यांच्या शेतातील बंड्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी १३ रोजी आरोपीस बेड्या ठोकून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती दिली. संतोष जयसिंग चंदेल (४५) असे मृतकाचे नाव आहे. तर राजू शंकर धात्रक रा. सातेफळ रोड हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची मदत करणाऱ्या १७ वर्षीय बालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

आरोपी राजू शंकर धात्रक याने मृतक संतोष चंदेल याचे शेत मक्त्याने घेतले होते. त्यामुळे दोघांत मक्त्याच्या पैशातून नेहमी वाद व्हायचा. १२ रोजी शुक्रवारी देखील मक्त्याच्या पैशातून दोघांत वाद झाला. अखेर संतापलेल्या राजूने अल्पवयीन मुलाच्या मदतीने संतोषच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार केला. तसेच त्याच्या डोक्यावर सिमेंटच्या दगडानेदेखील जबर मारहाण केली. यात संतोषचा जागीच मृत्यू झाला.

रक्ताच्या थारोळ्यात संतोषला ठेवून आरोपींनी तेथून पळ काढला. ही बाब शेत मालकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. मृतक संतोषची पत्नी ममता चंदेल यांनी याबाबतची तक्रार दाखल केली.

गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर, विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले, आशिष मेश्राम यांचे पथक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले. अवघ्या २४ तासांत आरोपी राजू धात्रक यास अटक करुन अल्पवयीन मुलास ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी