शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्याच्या मुलाची गुंडगिरी! बागेत खेळणाऱ्या मुलांना मारहाण करत गोळीबार; अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 12:39 IST

Crime News : नारायण प्रसाद यांचा मुलगा बबलू यांने दादागिरी केली आहे. बागेत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना मारहाण करत गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये एका मंत्र्याच्या मुलाची गुंडगिरी पाहायला मिळाली आहे. बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौतनचे भाजपा आमदार आणि बिहार सरकारचे पर्यटन मंत्री नारायण प्रसाद यांचा मुलगा बबलू यांने दादागिरी केली आहे. बागेत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना मारहाण करत गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री नारायण प्रसाद यांच्या मुलाने धमकावत हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये लहान मुलासह अनेक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या परिसरातील हरदिया या गावात हा संतापजनक प्रकार घडला. गावातील काही मुलं ही बागेत खेळत होती. त्याच दरम्यान बबलू हा मंत्री असलेल्या वडिलांच्या शासकीय वाहनातून आला होता. मंत्र्यांचा मुलगा आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी मुलांना मारहाण करत हवेत गोळीबार केला. मारहाणीत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. 

सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल

ग्रामस्थांनी मंत्र्यांचे ते वाहन ताब्यात घेतले. लोकांनी मंत्र्यांच्या वाहनावरील नेम प्लेट तोडून त्यांच्या वाहनाला घेराव घालून जोरदार निदर्शने केली. यानंतर मंत्र्यांचा मुलगा आणि इतर लोक घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये लोक पळताना दिसत आहेत. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंत्र्यांचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांचा पाठलाग सुरू केला. पण ते  गाडी सोडून पळून गेले.

गावामध्ये तणावाचं वातावरण

मंत्री नारायण प्रसाद कठैया हे विष्णुपुरवा येथील रहिवासी आहेत. गोळीबार झाल्याची माहिती मंत्र्यांनी नाकारली आहे. त्यांनी असं काहीच घडलं नसल्याचं म्हटलं आहे. माझ्या मुलावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे एक राजकीय षडयंत्र आहे असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून गावामध्ये तणावाचं वातावरण असल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BJPभाजपा