शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Crime News: मोठी कारवाई, निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवरचा ९ कोटी ३६ लाखांचा साठा जप्त, मुंबई, भिवंडी आणि ठाण्यात तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 09:29 IST

Crime News: भिवंडीतील धामणकरनाका येथील अल्ताफ अत्तरवाला या दुकानावर छापा मारून hookah flavorचा माल गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने जप्त केला होता.

ठाणे : भिवंडीतील धामणकरनाका येथील अल्ताफ अत्तरवाला या दुकानावर छापा मारून हुक्का फ्लेवरचा माल गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने जप्त केला होता. या प्रकरणाच्या चौकशीतून गेल्या चार दिवसांत या पथकाने नऊ कोटी ३६ लाख ७८ हजार ५२० रुपयांचा हुक्का फ्लेवरचा माल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी दिली.

धामणकरनाका येथील  अल्ताफ अत्तरवाला या दुकानावर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडीतील युनिट २ च्या पथकाने छापा टाकून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला आठ हजार ९४० रुपयांचा ५७ प्रकारचा  हुक्का फ्लेवर्सचा माल जप्त केला होता.  या प्रकरणी  नारपोली पोलीस ठाण्यात  ६ ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ ते ९ ऑक्टोबर रोजी दापोडा गाव परिसरातील हरीहर कॉम्प्लेक्स येथील कृष्णा कन्स्ट्रक्शन या इमारतीमधील गोदामात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव आणि उपनिरीक्षक शरद बरकडे आदींच्या पथकाने धाडसत्र राबविले. या छाप्यात निकोटीनयुक्त  अफजल हुक्का फ्लेवरचे आठ कोटी ४२ लाख ४९ हजार ६१० रुपयांचे २८६२ बॉक्स आणि सोएक्स हर्बल फ्लेवरचे ९४ लाख २८ हजार ९१० रुपयांचे ३७५  बॉक्स असा एकूण नऊ कोटी ३६ लाख ७८ हजार ५२० रुपयांचा हुक्का फ्लेवरचा माल जप्त केला.

अफजल आणि सोएक्स या दोन्ही हुक्का फ्लेवरचा माल मुंबईतील सोएक्स इंडिया  या कंपनीकडून उत्पादित आणि निर्यात केला जात आहे.  सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून बनविलेल्या निकोटीनयुक्त  अफजल हुक्का फ्लेवरची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तस्करी होते. 

हुक्क्याच्या सेवनामुळे तरुणांच्या  आरोग्यावर घातक परिणाम होतो. शिवाय, हीच मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळल्याचे आढळले आहे. हुक्का फ्लेवरचा बेकायदा साठा केलेल्या कंपनीविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येत आहे. - लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी