शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! 2 मुलांना सोडून पत्नी प्रियकरासोबत पळाली, पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 14:45 IST

Crime News : एका महिलेने आपल्या पतीला सोडून तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या मुलाशी लग्न केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - राजस्थानच्या झुंझुनू येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंघाना पोलीस स्टेशन हद्दीतील ढाणा गावातील एका महिलेने आपल्या पतीला सोडून तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या मुलाशी लग्न केल्याची घटना घडली आहे. पीडित पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध सिंघानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सिंघाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी भजनाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाणा गावात राहणाऱ्या हेमराजचे 17 जुलै 2013 रोजी एका महिलेशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

पाच महिन्यांपूर्वी पत्नी प्रियकर संदीपसह फरार झाली होती. या दोघांचे जवळपास 10 महिने प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांचे प्रेमप्रकरण हरिद्वार येथून सुरू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर 2021 रोजी हेमराजच्या ताईचे निधन झाले. 26 सप्टेंबर रोजी ताईंच्या अस्थीकलशाच्या विसर्जनासाठी कुटुंबीय हरिद्वारला गेले होते. यावेळी हेमराजची पत्नी त्याच्यासोबत होती. हरिद्वारमध्ये ताईंच्या अस्थीकलशाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमादरम्यान हेमराजच्या पत्नीची सीकर जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या संदीपशी भेट झाली. 

हरिद्वारमध्ये दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. यानंतर गावात आल्यावर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 4 जानेवारी 2022 रोजी पत्नी तिचा प्रियकर संदीपसोबत तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून पळून गेली. यानंतर पती हेमराजने 6 जानेवारी रोजी सिंघाना पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सिंघाना पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर पीडित हेमराजच्या पत्नीचा शोध सुरू केला आणि 13 रोजी ती सापडली. शोध घेतल्यानंतर तिला सिंघाना पोलीस ठाण्यात आणण्यात आले, 

पत्नीने पोलीस ठाण्यात प्रियकर संदीपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिला तिच्या प्रियकरासह पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, ढाणा गावातील हेमराजचा विवाह 17 जुलै 2013 रोजी 33 वर्षीय महिलेसोबत झाला होता. लग्नाच्या सुमारे वर्षभरानंतर तिने मुलीला जन्म दिला. यानंतर दोघांना एक मुलगा झाला. दोघांचे आयुष्य आनंदात चालले होते पण अचानक पत्नी हरिद्वारमध्ये स्वतःहून पाच वर्षांनी लहान असलेल्या संदीपच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी