शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! सलमान खानच्या चित्रपटाचं तिकीट देण्यास नकार दिल्याने 'तो' संतापला, चाकूहल्ला केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 22:28 IST

Crime News : चित्रपटाचं तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका तरुणाला आरोपीने स्वतःचं तिकीट काढण्याची सूचना केली. मात्र तरुणाने त्याला नकार दिल्यानंतर चाकूने हल्ला करून तो फरार झाला होता.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान आता एक भयंकर घटना समोर आली आहे. अभिनेता सलमान खानचा चित्रपट 'अंतिम'चं तिकीट काढून द्यायला नकार दिल्यानंतर एका तरुणाने चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चित्रपटाचं तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका तरुणाला आरोपीने स्वतःचं तिकीट काढण्याची सूचना केली. मात्र तरुणाने त्याला नकार दिल्यानंतर चाकूने हल्ला करून तो फरार झाला होता. मात्र आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

दिल्लीतील चांदनी महल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या चित्रपटाचं तिकीट काढण्यासाठी अजय नावाचा थिएटरबाहेर उभा होता. त्याचवेळी सैय्यद झियाउद्दीन नावाचा तरुण तिथे पोहोचला. आपल्यालाही सलमान खानच्या चित्रपटाचं तिकीट काढून दे, अशी धमकी सैय्यदने अजयला दिली. अजयने त्याला स्पष्ट नकार दिला. यावरून चिडलेल्या सैय्यदने स्वतःजवळचा धारदार चाकू बाहेर काढला आणि अजयवर वार केला. अजयचं पैशांचं पाकिट त्यानं हिसकावून घेतलं आणि तिथून पळ काढला. 

थिएटरच्या परिसरात गर्दी असल्यामुळे ही घटना घडल्यानंतर नागरिकांनी चोर-चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली. या परिसरात पेट्रोलिंगच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना हा आरडाओरडा ऐकला आणि धावणाऱ्या तरुणाचा पाठलाग सुरू केला. काही वेळातच पोलिसांनी त्याला पकडलं. सैय्यद हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस रेकॉर्डवरून दिसून आलं आहे. लूटमार आणि हल्ल्याच्या 26 केसेस त्याच्याविरोधात दाखल असून त्याने काही वर्षे तुरुंगाची हवादेखील खाल्ली आहे. दिल्ली पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली