शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

बाबो! 7 जणींशी संसार थाटून भामटा फरार; एकाच कॉलनीत होत्या तिघी, 'असा' ओढायचा जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 13:29 IST

Crime News : सात पत्नींपैकी तिघीजणी एकाच कॉलनीत राहत होत्या. मात्र आपला पती एकच असल्याची कल्पना त्यांना नव्हती.

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भामट्याने घटस्फोटाच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एक, दोन नव्हे तर तब्बल सात जणींशी विवाह केल्याची घटना समोर आली आहे. श्रीमंत आणि घटस्फोटीत महिलांना लक्ष्य करून त्याने त्यांना लाखोंचा गंडा घातला. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या सात पत्नींपैकी तिघीजणी एकाच कॉलनीत राहत होत्या. मात्र आपला पती एकच असल्याची कल्पना त्यांना नव्हती. फसवणूक झालेल्या महिलांपैकी बहुतेक जणी हैदराबादच्या रहिवासी आहेत. त्या उच्चशिक्षित असून चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. यापैकी दोघींनी सोमाजीगुडा प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदापा शिवशंकर बाबू असं आरोपीचं नाव असून तो आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील बेतापुडी गावचा रहिवासी आहे. त्याने इंजिनीयरिंग केलं आहे. मॅट्रिमॉनियल साईट्सवर दुसऱ्या लग्नासाठी नोंदणी केलेल्या महिलांना शिवशंकर लक्ष्य करायचा. आपण घटस्फोटीत असून आपल्याला एक मुलगीदेखील असल्याचं तो महिलांना सांगायचा. त्यांना घटस्फोटाचं प्रमाणपत्रदेखील दाखवायचा. आपण एका आयटी कंपनीत कामाला असून आपल्याला महिन्याला 2 लाख रुपये पगार असल्याची बतावणी शिवशंकर करायचा. त्यामुळे घटस्फोटित महिलांचे कुटुंबीय हुंडा देऊन त्यांच्या मुलींचा विवाह शिवशंकरशी करून द्यायचे.

लग्नानंतर शिवशंकर त्याच्या पत्नीला नोकरी सोडण्यास सांगायचा. कंपनी आपल्याला प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवणार असल्याची बतावणी करत शिवशंकर पत्नीच्या कुटुंबाकडून लाखो रुपये घ्यायचा. त्यानंतर अमेरिकेचा दौरा रद्द झाल्याची थाप मारायचा. कुटुंबानं पैसे परत करण्यास सांगितल्यास टाळाटाळ करायचा. पीडित तरुणीपैकी एकीने या प्रकरणी रामचंद्रपुरम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शिवशंकरला चौकशीसाठी बोलावलं. त्यांच्यासमोर शिवशंकर वेगळ्याच महिलेला घेऊन आला आणि ती आपली पत्नी असल्याचा दावा केला.

दोन्ही महिलांनी एकमेकींचे नंबर घेतले. त्यांनी एकमेकींशी संपर्क साधल्यानंतर त्यांना सत्य समजलं. दोघींनी सारख्याच पद्धतीनं फसवण्यात आलं होतं. शिवशंकरच्या दुसऱ्या पत्नीनं तिच्या लहान भावंडांना त्याच्यावर नजर ठेवण्यास सांगितली. एकाच कॉलनीमध्ये शिवशंकरचे तीन महिलांशी संबंध असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दोन पत्नींना आपल्याबद्दलची खरी माहिती समजल्याचं लक्षात येताच शिवशंकर फरार झाला. त्यानंतर दोन महिलांनी आणखी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवशंकरनं एकूण सात जणींशी लग्न केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी