शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"जान मैं मर रही हूं", इन्स्टाग्रामवर मेसेज करत तरुणीची आत्महत्या; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 10:05 IST

Crime News : एका तरुणीने प्रेमप्रकरणातून विष पिऊन आत्महत्या केली. विष घेण्यापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर "जान मैं मर रही हूं" असं लिहिलं होतं.

नवी दिल्ली - छत्तीसगडमध्य़े एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरबा येथे एका तरुणीने प्रेमप्रकरणातून विष पिऊन आत्महत्या केली. विष घेण्यापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर "जान मैं मर रही हूं" असं लिहिलं होतं. तसेच मोबाईलवर रडत रडत मुलीने विष पितानाचा व्हिडिओही रेकॉर्ड केला. याच दरम्यान, मध्यरात्रीनंतर नातेवाईकांच्या ही गोष्ट लक्षात येताच तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना बाकीमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

कोरबा येथील बाकीमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजरा बस्ती येथे 19 वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पूजा घरात जेवण करून झोपली होती. मात्र, मध्यरात्री पूजाची तब्येत ढासळू लागली. यावेळी पूजाच्या घरच्यांनी तिची चौकशी केली असता तिने, विष प्यायल्याचे सांगितले. यानंतर पूजाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, पूजा एक वर्षापूर्वी बांकीमोंगरा येथील एका कपड्याच्या दुकानात काम करत होती.

कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी तिचे रोहित गंभीर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसांपूर्वी दोघेही एकत्र घरातून पळून गेले होते. यानंतर नातेवाईकांनी समजावल्यानंतर तिला घरी आणले. विष पिण्यापूर्वी पूजाने रोहितला स्वतः विष घेत आत्महत्या करत आहे, असा मेसेजही पाठवला आणि मोबाईलवर रडत विष पितानाचा व्हिडिओही तयार केला. 

दरम्यान, शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र, आता पूजाच्या मृत्यूमागे रोहित जबाबदार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी