शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलाने तरुणीला फरफटत झुडपात नेलं; दगडाने मारून बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:10 IST

Crime News : अल्पवयीन मुलाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झुडपात नेलं होतं. यानंतर त्याने तिचे हात दुपट्ट्याने बांधण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली - केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने विकृतीचा कळस गाठला आहे. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 21 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी कॉम्प्यूटर क्लाससाठी निघाली असताना मुलाने तिचा पाठलाग केला.

अल्पवयीन मुलाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झुडपात नेलं होतं. यानंतर त्याने तिचे हात दुपट्ट्याने बांधण्याचा प्रयत्न केला. तसेच दगडाने डोक्यावर वार करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तिला जीवे मारण्यासाठी त्याने हे केलं. या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसते त्यामुळे घटना घडली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने आरोपीपासून सुटका करुन घेत पळ काढला आणि घर गाठलं. 

तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू

पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, मुलाला पकडण्यात आता पोलिसांना यश आलं आहे. तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलाने केलेल्या कृत्याने पोलीस देखील हैराण झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळ