शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; नेत्याकडे नेलं अन्…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 12:26 IST

Crime News : आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे ही संतापजनक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पीडितेने केलेल्या आरोपानुसार, तरुणी आपल्या लग्नाची पत्रिका वाटत असताना तिचं अपहरण करण्यात आलं. तीन जणांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तिला एका राजकीय नेत्याकडे नेलं आणि नंतर मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील गावात एका व्यक्तीसोबत राहण्यास भाग पाडलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. 

पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, "18 एप्रिलला लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेले असता गावातील तीन तरुणांनी अपहरण केलं. 21 एप्रिलला हे लग्न होणार होतं". तरुणीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि नंतर एका नेत्याकडे सोपवलं ज्याने काही दिवस आपल्याला झाशीत ठेवलं असा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीची इच्छा नसतानाही तिला मध्य प्रदेशातील दातिया येथे एका व्यक्तीसोबत राहण्यासाठी पाठवलं.

तरुणीने आपल्या वडिलांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली आहे. तरुणीने अपहरण, बलात्कार आणि विक्री केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी