शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याची आग! Ex गर्लफ्रेंडवर झाडल्या गोळ्या नंतर स्वत:ही नदीत उडी मारुन केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:23 IST

Crime News : एका विवाहित व्यक्तीने आपल्याला धोका दिलेल्या एक्स प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:ही नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - प्रेमात काही लोक वाटेल ते करतात. धोका मिळाला तर काही जण टोकाचं पाऊल उचलतात. जीवही घेऊ शकतात. अशीच एक धक्कादायक घटना आता मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात घडली आहे. एका विवाहित व्यक्तीने आपल्याला धोका दिलेल्या एक्स प्रेयसीची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:ही नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता सत्य समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील पोलीस चौकी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नर्मदा पुलावर  23 जुलै रोजी जोगनी नगर रामपूर निवासी अनिभा केवट हिचा मृतदेह एका कारमध्ये होता. अनिभाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा मृतदेह सापडल्याच्या तीन दिवसानंतर पटेलचा मृतदेहही तिलवारा पुलाजवळ आढळला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी खोट्या पत्रकार गँगवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर पटेलला देखील अटक करण्यात आली होती आणि त्याला जेलमध्ये पाठवलं होतं. दुसरीकडे त्याची प्रेयसी अनिभाचं मनी ट्रान्जेक्शन कंपनीच्या मॅनेजरसोबत अफेअर सुरू होतं. जेव्हा बादल पटेल तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याला आपल्या प्रेयसीबद्दल कळालं, यानंतर तो संतापला. त्याने आपल्या प्रेयसीला समजावण्यासाठी आयटी पार्कस्थित ऑफिसच्या बाहेर बोलावलं आणि तिला आपल्या मित्राच्या कारमध्ये बसवून नर्मदा पुलावर घेऊन गेला.

दोघांमध्ये भांडण झालं आणि बादल पटेलने अनिभाला गोळी घातली. यात तिचा मृत्यू झाला. यानंतर त्याने अनिभाचा मृतदेह कारमध्येच ठेवला आणि स्वत: नर्मदा नदीत उडी मारल्य़ाची घटना घडली आहे. पोलिसांना नदीमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच अधिक चौकशी केली असता हा भयंकर प्रकार समोर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी