शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: गुंतवणूकदारांची पावणेतीन कोटींची फसवणूक, ४० आठवड्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 08:59 IST

Crime News: ४० आठवड्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीस भाईंदरच्या नवघर पोलिसांनी कोणाच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून अटक केली आहे. ५८७ गुंतवणूकदारांकडून २ कोटी ७३ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम आरोपीने गोळा केली आहे. 

 मीरा रोड : ४० आठवड्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीस भाईंदरच्या नवघर पोलिसांनी कोणाच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून अटक केली आहे. ५८७ गुंतवणूकदारांकडून २ कोटी ७३ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम आरोपीने गोळा केली आहे.

भाईंदर पूर्वेच्या पंचरत्न इमारतीत रवींद्र शिवाजी जरे, रा. इंद्रलोक, भाईंदर पूर्व हा अस्मिता एंंटरप्राईजेस नावाने बेकायदेशीररित्या ४० आठवडे मुदतीची बोगस गुंतवणूक योजना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुंतवणुकीच्या रकमेवर प्रती आठवडा ५ टक्के परतावा यानुसार ४० आठवड्यांत रक्कम दुप्पट करून देण्यासह गुंतवणूकदारांना आकर्षीत करणाऱ्या एजंटला १ ते ४ टक्केपर्यंत कमिशन दिले जात होते. किमान १० हजार गुंतवण्याचे बंधन होते. यातून लोकांची फसवणूक होण्याची खात्री पोलिसांना पटली.

नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई, निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, उपनिरीक्षक राम कदम व प्रमोद पाटील यांच्या पथकाने चौकशी सुरू केली. पोलीस अधिकारी हे एका खासगी व्यक्तीसह गुंतवणूकदार बनून जरे याला भेटले. त्याला गुंतवणूक योजना व परतावा आणि गोळा होणाऱ्या पैशांचा काय विनियोग करतो याबाबत विचारपूस केली. त्यावेळी जरे याने आपण शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असून, त्यातून प्रती आठवडा ५ टक्के परतावा देत असल्याचे सांगितले. परंतु जरे हा गुंतवणूक योजना चालवण्याचा सक्षम प्राधिकरणाचा परवाना दाखवू शकला नाही. त्यामुळे दोन पथके बनवून जरे याच्या कार्यालय व घरावर छापा टाकला.

११ लाख ७१ हजाराचा ऐवज जप्त- झडतीदरम्यान आरोपीच्या घर व कार्यालयामधून गुंतवणूकदारांची यादी, गुंतवणूकदारांना देण्यात आलेल्या पावत्या, माहिती पत्रक, इत्यादी कागदपत्रे व ११ लाख ७१ हजार रोख असा मुद्देमाल पोलिसांना सापडला. - रवींद्र जरे याच्यावर फसवणूक व बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

सात खाती गोठवली- जून २०२१ पासून सुमारे ५८७ गुंतवणूकदारांकडून २ कोटी ७३ लाख ६८ हजार रक्कम जमा.- एजंटना १ ते ४ टक्क्यापर्यंत कमिशनही दिले. - पोलिसांनी ७ बँक खाती गोठवली. खात्यात २४ लाख रुपये.- न्यायालयाने सुनावली १० दिवसांची पोलीस कोठडी. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी