शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Gang Rape in Palghar: पालघरच्या सातपाटीत महाराष्ट्राला हादरवणारी घटना; अल्पवयीन मुलीवर ११ जणांचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 07:22 IST

पाच जणांना अटक, सहा तरुण फरार. पालघरमधील अनेक समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळनंतर शुकशुकाट असतो. येथील सुरूची बने, झुडपांत नशेबाजांचा वावर असतो.

लाेकमत न्यूज नेटवर्कपालघर : माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.  याप्रकरणी पाच तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली असून अन्य सहा तरुणांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाने पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सातपाटी सागरी पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या माहीम चौकी दूरक्षेत्रातील माहीम पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर ११ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे. 

या मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्यानंतर त्या मुलीने माहीम पोलिस चौकी गाठत या तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर सातपाटी सागरी पोलिस स्टेशनमध्ये पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. ही मुले माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा तपास सुरू आहे. 

किनाऱ्यालगतच्या शुकशुकाटाचा धोकापालघरमधील अनेक समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळनंतर शुकशुकाट असतो. येथील सुरूची बने, झुडपांत नशेबाजांचा वावर असतो. एकट्या-दुकट्या व्यक्तीला गाठून लुटण्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत त्यामुळे गस्त वाढवावी, नशेबाजांवर कारवाई करावी अशी मागणी यापूर्वीही ग्रामस्थांनी केली होती. त्यांना व्यसनांसाठी पदार्थ कोठून मिळतात हा प्रश्नही उपस्थित झाला होता. 

टॅग्स :palgharपालघरMolestationविनयभंग