शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

IAS अधिकाऱ्याच्या सुनेची आत्महत्या; 2 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न, वडिलांना फोन करून म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:34 IST

IAS अधिकाऱ्याच्या सुनेने विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वडिलांना फोन केला होता.

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका IAS अधिकाऱ्याच्या सुनेने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2 महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. राजस्थानमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. IAS अधिकाऱ्याच्या सुनेने विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वडिलांना फोन केला होता. त्यावेळी तिने पोटात खूप दुखत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी बीएल मेहरा यांच्या घरात ही घटना घडली. त्यांची पोस्टिंग अरमेर येथे आहे. त्यांचा मुलगा शिक्षण विभागात एलडीसीमध्ये काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकाऱ्यांची सून प्रियंका (25) हिने 1 जानेवारी रोजी विष घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी तिची तब्येत बिघडली होती. यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रविवारी तिचा मृत्यू झाला. पोलीस आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. 

1 जानेवारी रोजी प्रियंका आपल्या वडिलांसोबत फोनवर बोलली होती. तिला पोटदुखीचा त्रास होत होता. आत्महत्येच्या वेळी प्रियंका घरी एकटी होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रियंकाचं लग्न गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर रोजी झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कौटुंबिक जीवनात सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र तरीही प्रियंकाने 1 जानेवारी रोजी विष घेतलं आणि तिचा यामध्ये मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थान