शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! लेकाचा मृत्यू पाहून आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 10:53 IST

ग्वाल्हेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील मुरार केंट परिसरात मुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या आई-वडिलांनीही गळफास लावून आत्महत्या केली. आजूबाजूच्या लोकांच्याही हे लक्षात आलं नाही आणि तिघांचेही मृतदेह दोन दिवस लटकत राहिले. ग्वाल्हेरच्या हुरावली ए ब्लॉकमध्ये एक प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या पत्नीने आपल्या मुलाच्या आत्महत्येमुळे आत्महत्या केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचं समजतं. मात्र रविवारी पोलिसांना याची माहिती मिळाली.

पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. त्यांना मुलाचा मृतदेह घराच्या पहिल्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला व आतमध्ये प्रॉपर्टी डीलर व त्यांच्या पत्नीचे मृतदेह रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. प्रॉपर्टी डीलर जीतू उर्फ ​​जितेंद्र झा (51) आणि पत्नी त्रिवेणी झा (46) यांनीही मृत्यूला कवटाळलं. त्यांचा मुलगा अचल हा 17 वर्षांचा असून तो बारावीचा विद्यार्थी होता. 

संपूर्ण कुटुंब सिरोलच्या ए ब्लॉक कॉलनीत राहत होते. दोन दिवसांपासून कुटुंबातील कोणीही फोन उचलत नसल्याने ही घटना लोकांना समजली. यानंतर जितेंद्रच्या शेजारी राहणारे सासरे तेथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना मुलगा अचलच्या वहीत सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे  तिघांनीही आत्महत्या केली असून त्यात आधी मुलाने मग पत्नीने आणि नंतर जितेंद्रने आत्महत्या केली आहे. 

मुलाच्या आत्महत्येनंतर पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुसाईड नोटमध्ये प्रॉपर्टी डीलर जितेंद्र यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली असून हे सर्व मुलामुळे घडल्याचं म्हटलं आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार पार्टनर देवेंद्र पाठक असून, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असं त्यात लिहिलं आहे. देवेंद्र साक्षी अपार्टमेंटमध्ये राहतो आणि तो माझ्या मुलाला खूप त्रास देत होता असं सांगितलं. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी