शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! नोकरी देण्याच्या नावाखाली पतीच्या मित्रांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 22:00 IST

Crime News : सामूहिक बलात्कारानंतर तिच्या तीन अल्पवयीन मुलींचेही अपहरण करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना आता घडली आहे. दिल्लीतील सीमापुरी भागात एका 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पतीच्या मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेचा आरोप आहे की, सामूहिक बलात्कारानंतर तिच्या तीन अल्पवयीन मुलींचेही अपहरण करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेने पोलिसांबाबत देखील एक दावा केला आहे. 

जेव्हा महिला या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा तिला तेथून हाकलून देण्यात आले. मात्र, हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामूहिक बलात्कार, अपहरण आणि धमकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 15 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे म्हणणे आहे की 25 मार्चपासून ती यासाठी धडपड करत होती, मात्र 15 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितेने दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की ती पती आणि तीन मुलींसोबत गाझियाबाद येथील इंदिरापुरम येथे राहत होती. 

5 महिन्यांपूर्वी पतीसोबत वाद झाल्यानंतर ती दिल्लीतील लक्ष्मी नगर येथे मित्राच्या घरी मुलींसोबत राहू लागली. याच दररम्यान, तिच्या पतीचा आणखी एक मित्र सापडला आणि त्याने महिलेला गाझियाबादमधील शहीद नगरमध्ये भाड्याची खोली आणि नोकरी दोन्ही मिळवून देण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी त्या व्यक्तीने महिलेला शहीद नगरमध्ये खोलीही मिळवून दिली. दरम्यान, 4 मार्च रोजी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली त्यांना जुन्या सीमापुरी येथे बोलावण्यात आले. 

महिलेला एका खोलीत नेले, जिथे त्याच्यासोबत आणखी दोन लोक उपस्थित होते. त्या दिवशी तिघांनी खोलीला कुलूप लावून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओही बनवला, असा आरोप महिलेने केला आहे. तक्रार केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या तिघांनी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ती तिच्या तीन मुलींसह नरेला येथे राहू लागली, मात्र आरोपी तिला सतत फोन करून धमकावत आहेत. एका हिंदी  वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली