शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! 'त्याने' आधी तिला मारलं नंतर स्वत:लाच संपवलं; पोलीसही हैराण, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 16:14 IST

Crime News : एका पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वत:लाच संपवल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वत:लाच संपवल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या ख्याला परिसरातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर सर्जिकल ब्लेडने हल्ला करून तिला जखमी केलं आणि त्यानंतर घटनास्थळावरून तो फरार झाला. मात्र जेव्हा पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी एका नातेवाईकाच्या घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आरोपीने आत्महत्या केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये एक फोन आला. त्यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने याबाबत माहिती दिली. आरोपीने आपल्या पत्नीवर सर्जिकल ब्लेडने जीवघेण्या हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण त्यावेळी आरोपी फरार झाला होता. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

मानसी गंभीररित्या जखमी

रामकुमार बजाज असं आरोपीचं नाव असून त्याने पत्नी मानसी बजाजवर रागाच्या भरात हल्ला केला. सर्जिकल ब्लेडने खूप वार केले आणि तो पळून केला. यामध्ये मानसी गंभीररित्या जखमी झाली आहे. मानसी आणि तिच्या पतीमध्ये अनेकदा विविध कारणांमुळे वाद होत असायचे. त्यामुळे कंटाळून मानसी माहेरी निघून आली होती. रामकुमार मानसीला पुन्हा सासरी घेऊन जाण्यासाठी आला होता. पण मानसीने त्याच्यासोबत येण्यास नकार दिल्याने पुन्हा त्यांच्यामध्ये मोठं भांडण झालं. 

परिसरात एकच खळबळ

मानसीची आई घरी नसताना रामकुमारने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. सर्जिकल ब्लेडने खूप वार केल्यामुळे त्याला मानसीचा मृत्यू झाला असं वाटलं आणि तो घाबरून फरार झाला. या घटनेनंतर पोलीस रामकुमारचा शोध घेत होते. पण त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. याच दरम्यान पोलिसांनी रामकुमारच्या एका नातेवाईकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तर तिथे आरोपी त्यांना पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी