शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : घरात पत्नीला जाळत होता पती, दुर्गंध येताच शेजारच्यांनी विचारले तर म्हटला...; पाहणारे हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 18:58 IST

पतीने पत्नीला घरातच जिवंत जाळून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.

Crime News West Bengal:  पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये पतीच्या क्रूरतेची एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे पतीने पत्नीला घरातच जिवंत जाळून ठार केल्याची घटना घडली. दुर्गंध आल्यावर शेजाऱ्यांनी त्या व्यक्तीला काय करत आहेस असा प्रश्न केला. त्यावेळी आपण मांस शिजवत असल्याचं उत्तर त्यानं दिलं. परंतु शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घरात डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसनसोलच्या जामुरिया येथील निघा भागात राहणारी कांचन नोनिया हिचा विवाह २०१५ मध्ये आसनसोल दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीतील धेमोमेन कोलियरी येथे राहणारा सुधीर नोनिया याच्याशी झाला होता. दरम्यान, गुरुवारी सुधीरच्या घरात काहीतरी जळत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले.

धूर आणि दुर्गंधीबाबत विचारणा केली असता सुधीरने सांगितले की, घरात मांस तयार केले जात होते. मात्र शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता तो कांचनचा मृतदेह जाळत असल्याचे दिसून आले. काही लोकांनी आपल्या मोबाईलमधून या घटनेचा व्हिडीओ काढला. या घटनेत कांचनचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सध्या चार आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती डीसीपी डॉ. कुलदीप एसएस यांनी दिली.

नातेवाईक म्हणाले, हुंड्यासाठी मुलीची हत्याकांचनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुधीरने लग्नादरम्यान हुंडा म्हणून तीन लाख रुपये घेतले होते. सुधीर आणि त्याच्या कुटुंबीयांनी कांचनवर हुंडा आणण्यासाठी दबाव टाकला होता. त्याला २० हजार रुपयांचा ब्लेझर हवा होता. ही गोष्ट आम्हाला मुलीनं सांगितली होती. पैसे न दिल्यास सासरचे लोक मारतील, असे त्याने सांगितले होते आणि ते आता खरं ठरल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कांचनचा पती सुधीर, सासरा गुलाब नोनिया, सासू मैना देवी आणि जावई अर्जुन नोनिया यांना अटक केली आहे.

दरम्यान, महिलेचा पती बेरोजगार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाचे वडील कोळशाच्या खाणीत काम करतात. दरम्यान, ही गोष्ट कशी घडली हे आपल्याला माहिती नसल्याचं तो पोलिसांना सांगत असल्याचंही समरो आलं आहे. त्याच्या दाव्याबाबत पोलीस शेजाऱ्यांकडेदेखील चौकशीही करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगाल