शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोट दुखतं म्हणून आजी नातीला घेऊन रुग्णालयात गेली; सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 14:23 IST

Crime News : विद्यार्थिनी आपल्या आईच्या निधनानंतर आपल्या आजीसोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात खूप दुखत असल्याने आजी तिला जवळच असलेल्या डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन गेली.

नवी दिल्ली - देशामध्ये अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. अकरावीत शिकणारी एक विद्यार्थिनी आपल्या आईच्या निधनानंतर आपल्या आजीसोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात खूप दुखत असल्याने आजी तिला जवळच असलेल्या डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन गेली. तिथं गेल्यावर आजीने जे काही ऐकलं त्यानंतर तिला खूप मोठा धक्काच बसला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी विद्यार्थिनी 6 महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगितलं. 

कुंडम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय विद्यार्थिनीच्या आईचं लहानपणीच निधन झालं होतं. वडील नरसिंहपूर गोटेगाव गावात शिक्षक आहेत. ती आजीसोबत कुंडम येथे राहत होती. तिची आजीदेखील शिक्षिका होती. आजीच्या घरी दोन वर्षांपासून एक जण भाड्याने राहत आहे. त्या घरामध्ये तरुणाचं सतत त्यामुळे येणंजाणं असायचं. याच दरम्यान मुलीची आणि तरुणाची एकमेकांशी ओळख झाली. क्लासला आणि शाळेत जाताना तरुण तिला नेहमीच अडवायचा. 

शेजारी राहणाऱ्या तरुणाने साधला डाव

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शाळेत येत-जात असताना तरुण तिला वारंवार तिच्यावर प्रेम करीत असल्याचं सांगत होता. तिने त्याला आधीच नकार दिला होता. जून 2021 रोजी एक पार्टी ठेवली होती. जेवण छतावर होतं. पीडिता खोलीत एकटीच होती. त्यावेळी तरुण तेथे पोहोचला. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. बदनाम करण्याची धमकी दिली. त्यामुळे विद्यार्थिनी खूपच घाबरली आणि तिने याबाबत कोणालाच काही सांगितलं नाही. घाबरून हा धक्कादायक प्रकार लपवून ठेवला.

विद्यार्थिनी 6 महिन्यांची गर्भवती, घटनेने खळबळ

जूननंतर मुलीला पाळी येत नव्हती. यानंतर तिने गावातील एका डॉक्टरला दाखवलं होतं. काही महिन्यांनंतर तिची पोटदुखी वाढू लागली. यानंतर तिने आजीला याबद्दल सांगितलं. जेव्हा तिला डॉक्टरकडे दाखवलं तोपर्यंत ती 6 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर तिला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या सूचनेनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, धमकी आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी