शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडने स्वतःच्या शरीरात इंजेक्ट केलं HIV पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 10:20 IST

Crime News : मुलीने आपल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त इंजेक्शनमार्फत स्वतःच स्वतःच्या शरीरात टोचून घेतलं आहे.

प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात. कधी कधी ते प्रेमात इतके गुंतलेले असतात की त्यांना आपण काय करतोय याचं भानच राहत नाही. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. HIV ग्रस्त बॉयफ्रेंडच्या प्रेमात एक अल्पवयीन मुलगी इतकी वेडी झाली की तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलीने आपल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह बॉयफ्रेंडचं रक्त इंजेक्शनमार्फत स्वतःच स्वतःच्या शरीरात टोचून घेतलं आहे. आपल्याला कुणीच वेगळं करू नये, यासाठी तिने धक्कादायक कृत्य केलं.

पोलिसांनी याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुलाला अटक केली आहे. तर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसामच्या सुआलकुचीमध्ये ही घटना घडली. येथे राहणारी मुलगी अवघ्या 15 वर्षांची आहे. फेसबुकमार्फत तिची हाजोच्या सतडोलामध्ये राहणाऱ्या एका मुलाशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू आहे. यादरम्यान मुलीला आपल्या बॉयफ्रेंडला एचआयव्ही असल्याचं समजलं.

मुलीच्या प्रेमप्रकरणाबाबत आणि मुलगी ज्याच्यावर प्रेम करते तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे याची माहिती तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी त्यांच्या प्रेमाला विरोध केला. त्यांनी तिला त्याला न भेटण्याची सक्त ताकीद दिली. तरी मुलगी बऱ्याचवेळा बॉयफ्रेंडला भेटली. पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पण जितक्या वेळा ती त्याला भेटली तितक्या वेळा तिचे पालक तिला स्वतः जाऊन परत घेऊन आले. मुलीने यानंतर भयंकर पाऊल उचललं. 

आपल्या बॉयफ्रेंडला एचआयव्ही असल्याची माहिती होती. त्यामुळे तिने त्याच्या शरीरातून इंजेक्शनमार्फत रक्त काढलं आणि ते आपल्या शरीरात इंजेक्ट केलं. जेणेकरून कोणीच त्या दोघांना वेगळं करू शकणार नाही. मुलीने जे केलं ते समजताच सर्वजण हादरले. तिच्या कुटुंबाने याची पोलिसांना माहिती दिली. मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी त्या मुलाला अटक केली आहे. तर मुलीला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :HIV-AIDSएड्सCrime Newsगुन्हेगारी