शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News:  बालिकेवर शेजारच्याकडून अत्याचार; आईसह जीवे ठार मारण्याची दिली धमकी

By अझहर शेख | Updated: August 9, 2022 16:25 IST

Crime News: एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका ५६वर्षाच्या इसमाने वाट अडवून राहत्या घराच्या पाठीमागे नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर शारिरिक अत्याचार कर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

- अझहर शेख नाशिक - एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका ५६वर्षाच्या इसमाने वाट अडवून राहत्या घराच्या पाठीमागे नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर शारिरिक अत्याचार कर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्को व अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर त्र्यंबक पाटील (५६) असे संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीन पीडितेच्या कुटूंबियांतील ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला रस्त्यात एकटे गाठले. राहत्या घराच्या पाठीमागे घेऊन जात तेथे आईसह तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली व तिच्यावर शारिरिक, लैंगिक अत्याचार केले. ‘जर तु तुझ्या आईला सांगितला तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाके’ असे धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घयना २ ते ५ तारखेच्या दरम्यान घडली. बालिकेला शारिरिक त्रास होऊ लागल्याने तिला उपचारार्थ दाखल केले असता हा प्रकार समोर आला. पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी संशयित पाटील यास बेड्या ठोकल्या आहेत. त्यास जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक