शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदाताच झाला हैवान! 10 महिन्यांच्या लेकीला जमिनीवर आपटून मारलं; कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 10:41 IST

Crime News : वडिलांनी आपल्या दहा महिन्यांच्या निष्पाप मुलीला फरशीवर आपटून आपटून मारल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - पंजाबमधून एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जन्मदाताच हैवान झाला आहे. वडिलांनी आपल्या दहा महिन्यांच्या निष्पाप मुलीला फरशीवर आपटून आपटून मारल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. यामध्ये मुलीच्या आजी-आजोबांनी देखील साथ दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तसर जिल्ह्यातील रणजीतगड गावात ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

आरोपी पिता हा सैनिक असून सध्या अंबाला इथे तैनात आहेत. गुन्ह्यात आरोपीच्या पालकांच्या नावाचाही समावेश आहे. पोलिसांनी सर्वांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी असलेले मुलीचे वडील फरार असून पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. अंबाला कॅंटमध्ये तैनात असलेल्या सतनाम सिंहचा विवाह लखोके बहराम (फिरोजपूर) गावात राहणाऱ्या अमनदीप कौरसोबत दीड वर्षांपूर्वी झाला होता.

लग्नानंतर काही दिवसांतच सतनामचे अमनदीप कौरसोबत भांडण सुरू झाले. अमनदीपच्या चारित्र्यावर संशय येऊ लागल्याने त्यांच्यातील वाद वाढतच गेला. याच दरम्यान, त्याने अमनदीपला घरातून हाकलूनही दिलं होतं. त्यावेळी अमनदीप गरोदर होती. सतनामने पत्नी अमनदीपपासून घटस्फोटासाठी न्यायालयात खटला दाखल केला. दुसरीकडे, अमनदीपने सतनामची तक्रार लष्कराच्या अधिकाऱ्यांकडे केली. या प्रकरणी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी अंबाला कॅन्टला फोन करून दोघांशी बोलणे केले. 

अमनदीप कौरने आपल्या माहेरी एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्यानंतरही दोन्ही कुटुंबात वाद होत होते. 12 जुलै रोजी पुन्हा दोघांना बोलावून त्यांना 20 दिवस एकत्र राहण्याचे आदेश दिले. यानंतर सतनामने पत्नी अमनदीप कौरला रणजीतगड गावात आणले. यानंतर जेव्हा भांडण झालं तेव्हा सतनामने अमनदीप कौरच्या हातातून मुलीचा हिसकावून घेतलं, आणि तिचे पाय पकडून तिला जमिनीवर आपटलं. यामध्ये तिचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी