शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! 14 वर्षे अंथरुणाला खिळलेल्या मुलाचा वडिलांनी घेतला जीव; अंगावर काटा आणणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 20:14 IST

Crime News : अंथरुणाला खिळलेल्या मुलाचा वडिलांनी जीव घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अंथरुणाला खिळलेल्या मुलाचा वडिलांनी जीव घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी पित्याने दारूच्या नशेत मुलाला बेदम केली आहे. ही मारहाण इतकी भयावह होती की, यामध्ये मुलगा बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत मुलाच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, परमजीत असं मुलाचं नाव असून गेल्या चौदा वर्षांपासून त्याला अर्धांगवायूचा (पॅरालिसीस) आजार होता. त्यामुळे तो अनेक वर्षांपासून अंथरुणालाच खिळलेला आहे. अशात परमजीतच्या वडिलांनी 8 जानेवारी रोजी रात्री दारू पिऊन घरी येत, परमजीतला काठीने बेदम मारहाण केली आहे. यावेळी परमजीत याची बहीण देखील घरी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी बहीण घरी आली असता, तिला परमजीत अंथरूणात जखमी अवस्थेत दिसला.

बहिणीने 9 जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास  भावाला भारत नगर येथील दीप चंद बंधू रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनी परमजीत याची प्राथमिक तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परमजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीजेआरएम रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी परमजीतच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भारत नगर पोलीस ठाण्यात आरोपी वडिलांविरुद्ध आयपीसी कलम 302 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत वडिलांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास भारत नगर पोलीस करत आहेत. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी