शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

सावकाराची मुजोरी! 3.5 लाख कर्ज घेतलं पण व्याज लावून केले 2 कोटी; शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 12:47 IST

Crime News : सावकाराकडून साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते सतत फेडत असतानाही सावकाराने इच्छेनुसार चक्रवाढ व्याज आकारून ही कर्जाची रक्कम वाढवून 2 कोटी केली.

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. करौली जिल्ह्यातील नादौती भागात एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की त्याने 10 ते 12 वर्षांपूर्वी सावकाराकडून साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते सतत फेडत असतानाही सावकाराने इच्छेनुसार चक्रवाढ व्याज आकारून ही कर्जाची रक्कम वाढवून 2 कोटी केली. यालाच कंटाळून शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून शेतकऱ्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नादौती पोलीस स्टेशन हद्दीतील सोप गावातील आहे. शेतकरी कमलराम मीना यांनी बुधवारी घराजवळील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या माहितीमुळे कमलराम यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना य़ाबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

शेतकरी कमलराम मीना यांचा मुलगा हरिचरण याने दिलेल्या माहितीनुसार, 10-12 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी भरोसीलाल मीना ऑपरेटरकडून 3.5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्ज हप्त्यांमध्ये फेडण्यात आले. शेतात जे काही पीक आले, ते देत राहिले. हरिचरण यांचा आरोप आहे की, भरोसीलालने बनावट पद्धतीने व्याजदर लादून ते तब्बल दोन कोटींपर्यंत पोहोचवलं. कर्ज फेडण्यासाठी तो वडिलांचा सतत छळ करत होता.

भरोसीलालने काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी येऊन वडिलांना शिवीगाळ केली. कर्ज फेडण्यासाठी त्यांचे वडीलही काही जमीन त्यांच्या नावावर द्यायला तयार होते. हरिचरणचा गंभीर आरोप आहे की सावकाराला संपूर्ण जमीन आणि त्याचे घर घ्यायचे होते. संपूर्ण जमीन आपल्या नावावर करण्यासाठी त्याने वडिलांवर दबाव आणला. याला कंटाळून वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. 

सावकारासह तिघांवर गुन्हा दाखल

मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी सावकार भरोसीलाल आणि त्याचे दोन सहकारी हेमराज आणि हरकेश यांच्या विरोधात नादौती पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. हेमराज आणि हरकेशवर जबरदस्तीने शेतकऱ्याच्या शेतात नांगरणी केल्याचा आरोप आहे. शेतकरी कमलराम मीना यांनी ग्रामीण गायकांमध्ये गायक म्हणूनही काम केलं आहे. स्थानिक भाषेत याला मेडिया म्हणतात. शेतकऱ्याला दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांचा एक मुलगा रेल्वेत नोकरी करतो. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थान