शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रख्यात युट्युबर तरुणीची निर्घृण हत्या, चेहरा विद्रुप केला, मृतदेह जमिनीत गाडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 16:59 IST

Crime News: हरियाणामधील रोहतक जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील महम येथे एका तरुणीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या अवस्थेत सापडला. तरुणीची ओळख दिल्लीतील प्रसिद्ध युट्युबर संगीत उर्फ दिव्या अशी पटली आहे.

रोहतक - हरियाणामधील रोहतक जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील महम येथे एका तरुणीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या अवस्थेत सापडला. तरुणीची ओळख दिल्लीतील प्रसिद्ध युट्युबर संगीत उर्फ दिव्या अशी पटली आहे. ही तरुणी गेल्या ११ दिवसांपासून बेपत्ता होती. नातेवाईकांनीं तिचे अपहरण झाल्याची तक्रारसुद्धा दाखल केली होती. दिल्लीमध्ये तिची हत्या करून नंतर तिचा मृतदेह महम येथे गाडण्यात आला, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयातील शवागारात ठेवला आहे. तसेच मृत तरुणीच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, मृतदेह सापडल्याची महिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर एफएसएलच्या टीमलाही पाचारण केले आहे. तपासानंतर टीमने सांगितले की, तरुणीच्या डोक्यावर जखमांची खूण आहे. तसेच दुसऱ्या ठिकाणी हत्या करून मृतदेह विद्रुप करण्याच्या हेतूने तो खड्डा खोदून दफन करण्यात आला होता. मृत तरुणीचा चेहरा पूर्णपणे कुजून गेला होता. एफएसएलच्या टीमने संपूर्ण परिसरात तपास करून पुरावे गोळा केले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, तरुणी तिचा एक युट्युब चॅनल चालवत होती. आज तिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केलं जाईल. पोलिसांना तिच्या दोन सहकलाकारांवर संशय आहे. सध्या ते दोघेही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.

एक व्यक्ती लघुशंका करण्यासाठी आडोशाला गेला असताना त्याने हात बाहेर आलेला पाहिला. त्याने या प्रकारची माहिती पोलिसांना दिली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमीन खोदून मृतदेहाला बाहेर काढले, तेव्हा हा एका तरुणीचा मृतदेह असल्याचे समोर आले.  तिचा मृतदेह चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाYouTubeयु ट्यूब