शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 1 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक, 6 मुलींसह 12 जणांना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:48 IST

crime news : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल सेंटरमध्ये प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली : सहज कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. द्वारका जिल्हा पोलिसांनी याप्रकरणी 6 मुलींसह 12 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट कॉल सेंटरमध्ये लोकांना टार्गेट करून फसवणुकीची घटना घडली. आतापर्यंत 1700 हून अधिक लोकांना सुलभ कर्ज मिळवून देण्यावरून लक्ष्य करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात ऑपरेशन टीमला माहिती मिळाली होती. बिंदापूर पोलिसांसह ऑपरेशन सेलच्या टीमने उत्तम नगर येथील बाल उद्यान रोडवर छापा टाकून या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. डीसीपी द्वारका एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आमिर, रोहित वर्मा, फैजल, विशाल, मोहित कुमार, संतोष, निधी, मेघा, अंशू, श्वेता, उषा आणि अर्चना यांचा समावेश आहे. हे सर्व गाझियाबाद आणि दिल्लीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 21 मोबाईल, 29 रजिस्टर, दोन नोटपॅड आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.

कॉल सेंटर ऑपरेटर फैजल आहे, तो उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवाशी आहे. औषध विकणे आणि औषधांचा प्रचार करणे, हे त्यांचे काम असल्याचेही  फैजल याने टीमला सांगितले होते, असे डीसीपी द्वारका एम हर्षवर्धन म्हणाले. तसेच, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी फैजल काही वेगवेगळ्या कंपन्यांची औषधे काउंटरवर ठेवत असे. त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना तो कस्टमर सपोर्ट एजंट म्हणून दाखवत होता. अशा प्रकारे तो कर्ज मिळवून देण्याचे नाटक करून लोकांना फसवत असे, असेही डीसीपी द्वारका एम हर्षवर्धन यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल सेंटरमध्ये प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फैजलचा आणखी एक मित्र पारस याचा शोध सुरू असून तो मूळचा गाझियाबाद येथील आहे. पोलिसांना मिळालेल्या 29 रजिस्टरच्या आधारे आतापर्यंत कॉल सेंटरच्या माध्यमातून एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली