शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! डीजे नाही आणला म्हणून नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल, लग्नाआधी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 17:30 IST

वऱ्हाड निघण्यापूर्वी काही मिनिटं आधी नवरदेवाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

नवी दिल्ली - घरात लग्नाची, नव्या नवरीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना एक भयंकर घटना घडली आणि क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. लग्नाआधीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सुखी संसार सुरू होण्याआधीच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेवाने आत्महत्या केली आहे. वऱ्हाड निघण्यापूर्वी काही मिनिटं आधी नवरदेवाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या लग्नात डीजे का आणला नाही, अशी विचारणा करत त्याने गळफास घेतल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

तरुणाने लग्नापूर्वी काही क्षण आधी आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नवरदेवाने हा निर्णय़ नेमका का घेतला असावा याची सध्या पोलीस चौकशी करत असून त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बांसवाडा परिसरात राहणाऱ्या लाल सिंह उर्फ विनोदच्या लग्नाचं वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होतं. सगळे पाहुणे आणि मित्रमैत्रिणी जमले होते. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. तेवढ्यात विनोद घरातून बाहेर गेला आणि परत आलाच नाही.

लग्नाआधी नवरदेवाची आत्महत्या; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा 

विनोदने त्याच्या घराजवळ असलेल्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. विनोदने ही आत्महत्या का केली, याचा पोलीस शोध घेत आहेत. लग्नात डीजे आला नसल्यामुळे तो नाराज असल्याची चर्चा वऱ्हाडी मंडळींमध्ये होत होती. त्यातूनच त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं. मात्र हे कारण नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी विनोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच याप्रकरणी अनेकांची चौकशी सुरू असून पोलीस आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधत आहेत. 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं, तर त्याच्या बहिणीचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं. थंडीमध्ये अंगावर घेण्यासाठी जी शाल वापरली जाते. त्याच्या मदतीने त्याने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. लग्नाआधी विनोद नाराज होता आणि त्यामुळेच तो बाहेर निघून गेल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न