शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पैशासाठी नातवाने आजीचा चिरला गळा: मित्रांना व्हिडीओ कॉलवर दाखवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:36 IST

Crime News : नातवाने आपल्या आजीकडे पैसे मागितले होते. परंतु आजीने पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे त्याने तिचा जीव घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. शालिमार बाग परिसरात एका 84 वर्षांच्या महिलेची तिच्याच नातवानं सर्जिकल ब्लेडने गळा चिरून हत्या केली आहे. या हत्येनंतर अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांना व्हिडीओ कॉल करून आजीचा मृतदेह दाखविला. नातवाने आपल्या आजीकडे पैसे मागितले होते. परंतु आजीने पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे त्याने तिचा जीव घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी दिल्लीतील शालिमार बाग भागात एका 84 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. 

पोलिसांना चौकशीदरम्यान समजलं की, मृत वृद्ध महिलेने अलीकडेच आपली मालमत्ता विकली असून ती शालिमार बाग परिसरातील घरात एकटीच राहत होती. पोलिसांनी महिलेच्या घराभोवती असलेल्या सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये पांढर्‍या टॉवेलने चेहरा झाकलेल्या एका संशयित व्यक्तीने रात्री तिच्या घरात प्रवेश केल्याचं आढळलं. यानंतर, तो व्यक्ती रात्री 11:20 वाजता बाहेर आला. यानंतर, पुन्हा रात्री 12:20 वाजता घरात प्रवेश करताना दिसला आणि काही काळानंतर पुन्हा बाहेर पडला.

पोलिसांनी सीसीटीसीमध्ये संशयित व्यक्तीला कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे बारकाईने पाहिले. जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी संशयिताची ओळख उघडकीस आणली, संशयित हा इतर कोणी नसून तो वृद्ध महिलेचा नातू होता. पोलिसांनी मृत महिलेच्या नातवाला ताब्यात घेतलं. मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याचे शाळेत त्याचे चार मित्र बनले होते. अल्पवयीन मुलाने त्या मित्रांकडून पैसे उसणे घेतले होते, जे त्यानं परत केले नव्हते. 

अल्पवयीन मुलाने त्या चौघांना सांगितले की, माझ्याकडे पैसे नाहीत आणि आजीने अलीकडेच प्रॉपर्टी विकली आहे. त्यामुळं तिच्याकडे खूप पैसे आहेत. परंतु माझी आजी एकटी राहते. तिला पैसे मागू. ती पैसे देऊ शकते. जर तिनं पैसे दिले नाहीत, तर तिला ठार करून पैसे आणता येतील. त्यानंतर या सर्वांनी एक प्लॅन बनवला. प्लॅननुसार हा अल्पवयीन मुलगा आजीच्या घरी पोहोचला आणि तिच्याकडे पैसे मागितले. जेव्हा आजीने नकार दिला तेव्हा त्या अल्पवयीन मुलाने आजीला ढकलले. यानंतर, सर्जिकल ब्लेडने गळा चिरून तिला ठार मारले. हत्येनंतर मित्रांना व्हिडीओ कॉलवर मृतदेह दाखवला आणि हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर मित्रांना कॉल करून एके ठिकाणी बोलवलं आणि आजीच्या घरातून लुटून आणलेले सुमारे 1 लाख पन्नास हजार रुपये देऊन कर्जाची रक्कम परत केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली