शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! बेडवर मुलीचा तर पंख्याला लटकलेला वडिलांचा मृतदेह; घटनेने खळबळ, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 12:43 IST

Crime News : दिल्लीतील मेट्रो विहार फेज 2 मध्ये ही घटना घडली असून मुलीची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. घरामध्ये बाप-लेकीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील मेट्रो विहार फेज 2 मध्ये ही घटना घडली असून मुलीची हत्या करून वडिलांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत मृत व्यक्तीच्या पुतण्याने तक्रार दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय सुरेश हे घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले, तर त्यांची 10 वर्षीय मुलगी मानसीचा मृतदेह बेडवर पडलेला होता. हा प्रकार सुरेश यांचा पुतण्या रोहन याच्या लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आसपासच्या लोकांकडून कुटुंबाबाबत माहिती घेतली. सुरेश यांची मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी होती. सुरेश यांची पत्नी रमा देवी या सफाई कर्मचारी आहेत. 

मुलीच्या आजारपणामुळे सुरेश यांनी नोकरी सोडून तिची देखभाल करण्याचा निर्णय घेतला. परंतु वैद्यकीय उपाचारानंतरही मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यामुळे सुरेश यांनी आधी मुलीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या करून जीवन संपवलं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मुलीच्या शरीरावर कसल्याही खूना आढळलेल्या नाहीत.

सुरेश यांची मुलगी चार ते पाच वर्षांपूर्वी दुसऱ्या मजल्यावरून कोसळली होती. या घटनेत ती गंभीररित्या जखमी झाली आणि तेव्हापासून तिच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. मुलीच्या आजारपणामुळे सुरेश हे कायम चिंताग्रस्त असत. याच नैराश्यातून त्यांनी मुलीसह स्वत:चं जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली