शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: झोलाछाप बोगस डॉक्टरचा प्रताप, ७५ वर्षांच्या वृद्धाला दिलं जनावरांचं इंजेक्शन, झाली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:11 IST

Crime News: एका बोगस डॉक्टरने  पाठदुकीने त्रस्त असलेल्या एका ७५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला जनावरांचं इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भुवनेश्वर - एका बोगस डॉक्टरने  पाठदुकीने त्रस्त असलेल्या एका ७५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला जनावरांचं इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओदिशामधील मयूरभंज जिल्ह्यातील गौडियाबहली गावातील ७५ वर्षीय दैतारी मोहंता पाठदुखीने त्रस्त होते. एकेदिवशी क्योंझर जिल्ह्यातील कांतिपाल येथील रहिवासी असलेला आणि स्वत: डॉक्टर असल्याचा दावा करणारा विश्वनाथ बेहरा त्यांच्या घरी आला. त्याने भुवनेश्वर येथून औषध आणि इंजेक्शन आणल्याचे सांगितले. तसेच या औषधामुळे आणि इंजेक्शनमुळे त्वरित दिलासा मिळेल आणि दुखणे थांबेल, असा दावा त्याने केला. त्यामुळे दैतारी यांनी विश्वनाथकडून इंजेक्शन घेण्यास तयारी दर्शवली.

दैतारी मोहांता यांनी होकार देताच विश्वनाथ याने त्यांना एकापाठोपाठ एक अशी तीन इंजेक्शन दिली. यातील प्रत्येक इंजेक्शनची किंमत ५०० रुपये होती. तसेच तीन दिवसांपर्यंत सहा गोळ्या खाण्यास दिल्या. तसेच त्याची फी म्हणून ४०० रुपये घेतले. मात्र ही इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून मोहंता यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ताप येऊ लागला. त्याबरोबरच जुलाबही सुरू झाले. त्यानंतर मोहंता यांना त्यांच्या मुलाने त्वरित ठाकुरमुंडा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.

अगदी योग्य वेळी रुग्णालयात दाखल केल्याने मोहंता यांचे प्राण वाचले. तसेच त्यांना दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ३०७, ३३७ आणि ४१७ अन्वये गुन्हा दाखल केले आहे. सध्या हा बोगस डॉक्टर फरार आहे.  दरम्यान, या डॉक्टरने याआधीही एका व्यक्तीला जनावरांचं इंजेक्शन दिलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOdishaओदिशाdocterडॉक्टर