शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! मंदिरात चोरी करण्यासाठी केली 7 कुत्र्यांची हत्या; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 16:10 IST

Crime News : एका मंदिरात चोरी करण्यासाठी चोरांनी तब्बल 7 कुत्र्यांची हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

नवी दिल्ली - बिहारमधील भभुआमध्ये एक धक्कादायक घटना घ़डली आहे. एका मंदिरात चोरी करण्यासाठी चोरांनी तब्बल 7 कुत्र्यांची हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. लोकांनीही मनस्ताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील भभुआ जिल्हा स्टेशन रोड येथे ही भयंकर घटना घडली आहे. भभुआ रोडच्या काही अंतरावर काली मातेचं जुनं मंदिर आहे. या मंदिराच्या दानपेटीवर काही लोकांची नजर होती. यापूर्वीही मंदिरातून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या दानपेटीवर समाजकंटकांची नजर होती. याशिवाय आजूबाजूच्या कुत्र्यांना मंदिरात जेवण दिलं जात होतं. कुत्रेदेखील मंदिराजवळ राहून राखण करीत होते. मंदिराची ग्रिल बंद होती, त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तर कुत्रे भुंकायला लागायचे. त्यामुळेच या भीतीने चोरांनी सर्व कुत्र्यांना जेवणात विष दिलं. 

घटनेदरम्यान सात कुत्रे हजर होते. चोरांनी सर्व कुत्र्यांची हत्या केली. यानंतर दरवाजा तोडून दानपेटीमध्ये असलेले सर्व पैसे चोरी केले. या घटनेनंतर लोकांनी संताप व्यक्त केला. लोकांनी ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं सांगितलं. याशिवाय मृत कुत्र्यांचं पोस्टमार्टम करण्याची मागणी केली जात आहे. स्थानिकांनी चोरांच्या अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :dogकुत्राCrime Newsगुन्हेगारी