शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: घरात लपून बसला आणि चाकूने केले सपासप वार, भिवंडी मनपाच्या सफाई कर्मचारी महिलेची हत्या

By नितीन पंडित | Updated: October 1, 2022 16:10 IST

Crime News: भिवंडी महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या महिलेची अज्ञात इसमाने धारदार चाकूने हत्या केल्याची घटना शहरातील कणेरी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. सविता शिवराम साळवे वय ४५ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

- नितीन पंडितभिवंडी:दि.१- भिवंडी महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या महिलेची अज्ञात इसमाने धारदार चाकूने हत्या केल्याची घटना शहरातील कणेरी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. सविता शिवराम साळवे वय ४५ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

हत्या करणारा आरोपी हा महिलेच्या घरातच दबा धरून लपून बसला होता.सकाळी सदर महिला काही कारणासाठी कामावरून घरी आली होती.घराचा दरवाजा उघडताच आत लपून बसलेल्या इसमाने महिलेच्या शरीरावर व गाळ्यावर धारदार चाकूने वार केले व घटनास्थळावरून पळून गेला.या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती.स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीला अटक केल्या नंतरच हि हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली आहे याची माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी