शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Badlapur: मोबाईल गेमच्या नाद! अल्पवयीन मुलीने मित्रासाठी घर सोडले, पोहोचली पश्चिम बंगालला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 22:14 IST

बदलापूर शहरात यापूर्वीही डिसकॉर्ड नावाच्या मोबाईल गेमच्या नादी लागून एका १३ वर्षांच्या मुलाने घर सोडून गोवा गाठले होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अंबरनाथ : मोबाईल गेमच्या नादी लागून एका मुलीने तिच्या मित्रासोबत घर सोडले, आणि थेट पश्चिम बंगालला पोहोचली. मात्र मुलीच्या घरच्यांनी तिचे अपहरण केल्याची तक्रार केली, आणि मुलगी बंगालला पोहोचताच पोलीस तिच्या स्वागतासाठी स्टेशनवर उभे ठाकले. एखाद्या चित्रपटात शोभावा, असा हा तपास उल्हासनगर क्राईम ब्रॅंचने केला. तसेच मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तिच्या मित्रालाही बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीला गेल्या दोन वर्षांपासून फ्री फायर या मोबाईल गेमिंग ऍपचा नाद लागला होता. याच गेमिंग ऍपवर तिची पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात राहणाऱ्या एस. के. बुद्धू या २२ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. त्यातूनच कधीच प्रत्यक्षात भेट न झालेल्या या दोघांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ही मुलगी क्लासला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र तिथून तिने थेट कल्याण स्टेशन गाठले. तिथे तिचा मित्र एस. के. बुद्धू याच्यासह कर्मभूमी एक्स्प्रेस पकडून हे दोघे बंगालला रवाना झाले.

इकडे मुलगी रात्रीपर्यंत घरी न आल्याने मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठत मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली. यानंतर उल्हासनगर क्राईम ब्रॅंचनंही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. ज्यात मुलीच्या मोबाईल लोकेशनननुसार ती कल्याण रेल्वे स्थानकावर असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार सीसीटीव्ही आणि रिझर्वेशन चार्ट तपासला असता, ती कर्मभूमी एक्सप्रेसने बंगालला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या गाडीचे लाईव्ह लोकेशन घेत पोलिसांनी पश्चिम बंगालच्या रेल्वे पोलिसांना संपर्क साधला आणि पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील डानकुणी रेल्वे स्थानकावर या दोघांनाही उतरवून घेण्यात आले. यानंतर मुलीचे कुटुंबीय आणि क्राईम ब्रँचचे पोलीस यांनी विमानाने जाऊन या दोघांना परत आणले.

मोबाईल गेम च्या नादात घर सोडले. यापैकी मुलीला तिच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले असून तिचा प्रियकर एस. के. बुद्धू याला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रॅंचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे. बदलापूर शहरात यापूर्वीही डिसकॉर्ड नावाच्या मोबाईल गेमच्या नादी लागून एका १३ वर्षांच्या मुलाने घर सोडून गोवा गाठले होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी