शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! हत्येच्या संशयावरून तरुणाला जिवंत जाळलं; गावकऱ्यांनी दिली तालिबानी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 14:45 IST

Crime News : एका तरुणाला रॉकेल टाकून जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान आसाममध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका तरुणाला रॉकेल टाकून जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला. तरुणावर एका नवविवाहितेला मारण्याचा आरोप होता. त्यानंतर गावकऱ्यांनी स्वत:च कोर्ट भरवलं आणि त्याला शिक्षा दिली. या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील नौगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील बोर लालुंग भागात ज्या तरूणाला जनसुनावणीनंतर जिवंत जाळण्यात आलं त्याचं नाव रंजीत बोरदोलाई असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला संध्याकाळी 6 वाजता जनसुनावणीनंतर एका व्यक्तीला जिवंत जाळून मारण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याच्यावर हत्येचा आरोप होता. जाळल्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

नौगावमधील ज्या गावात ही घटना घडलीय, तिथं कार्बी समाजाचे अनेक लोकं आहेत. गावातील एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, 'तीन दिवसांपूर्वी या भागात महिलेचा मृतदेह मिळाला. या महिलेचं नुकतंच लग्न झालं होतं. तिची हत्या करून गावाच्या तलावात मृतदेह फेकून देण्यात आला होता.' त्या व्यक्तीनं दावा केला की, 'रंजीतने महिलेची हत्या केल्याचं काही महिलांनी ऐकलं होतं, त्यानंतर गावात जनसुनावणी झाली. यामध्ये त्या महिलांना साक्षीसाठी बोलवण्यात आलं. 

सुनावणीच्या दरम्यान रंजीत बोरदोलोईने हत्या केल्याची कबुली दिली. आपण 5 जणांसोबत या महिलेचे हत्या केल्याचं त्याने सांगितलं. रंजीतने सर्वांसमोर गुन्हा कबुल केल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही जणांनी त्याच्यावर केरोसिन टाकलं आणि पेटवून दिलं अशी माहिती त्या व्यक्तीने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.