शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Crime News: प्रवासा दरम्यान झोप लागताच त्याने साधली संधी, लाखोंचा ऐवज लांबवला, पण सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्य़ात सापडला

By मुरलीधर भवार | Updated: February 11, 2023 14:18 IST

Crime News: एक प्रवासी आणि त्याची पत्नी अहमदाबाद कोल्हापूर रेल्वे एक्सप्रेस गाडीतून प्रवास करीत असताना दोघांना लागली झोप. त्याचा फायदा घेत चोरटय़ाने  प्रवाशाच्या पत्नीची पर्स लांबिवली आणि तो पसार झाला. मात्र...

- मुरलीधर भवारकल्याण - एक प्रवासी आणि त्याची पत्नी अहमदाबाद कोल्हापूर रेल्वे एक्सप्रेस गाडीतून प्रवास करीत असताना दोघांना लागली झोप. त्याचा फायदा घेत चोरटय़ाने  प्रवाशाच्या पत्नीची पर्स लांबिवली आणि तो पसार झाला. मात्र तो वसई शहरातील सीसीटीव्हीत पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला भायखळा येऊन अटक केली. त्याचे नाव सुभान अहमद असे असून तो मूळचा डहाणू येथे राहमारा आहे. तो सराईत चोरटा असून त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरीस गेलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच अन्य तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

पोलिसांनी सुभान अहमदला अटक केल्यानंतर त्याच्याकडून महिला प्रवासाची पर्स हस्तगत केली आहे. या पर्समध्ये ६ लाख ३९ हजार रुपये किंमतीचे दागिने होते. त्याचबरोबर पोलिसांनी अन्य तीन गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत केले आहे. त्या तीन मोबाईलच्या किंमती २१ हजार, ४५ हजार आणि १६ हजार रुपये आहेत. सुभान अहमद हा सराईत चोरटा असून कल्याण, पुणो, भुसावळ आणि भरुच या रेल्वे स्थानकात त्याच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 3क् जानेवारी रोजी एक व्यावसायिक त्यांच्या पत्नीसोबत अहमदाबाद कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करीत होते. दोघेही पती पत्नी बोगी क्रमांक-५ मध्ये होते. प्रवासा दरम्यान त्यांना झोप लागली.

चोरटा सुभान याच गाडीतून चोरीसासाठी सावज हेरत होता. त्याने झोपलेल्या महिला प्रवासीला लक्ष्य केले. तिची पर्स लंपास केली. ही घटना सुरत ते भिवंडी रेल्वे स्थानका दरम्यान घडली असल्याने चोरटास सुभान हा सुरतपासून त्यांच्यावर पाळत ठेवून होता. चोरी करुन तो वसई रेल्वे स्थानकात उतरला. त्यानंतर तिथून तो पसार  झाला. प्रवाशाला जाग येतात. त्याच्या पत्नीची पर्स चोरीला गेल्याचे कळाले. त्याने या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. चोरीस गेलेल्या पर्समध्ये लाखो रुपयांचे दागिने असल्याने हा तपास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने सुर केला. तपास पथकाने सुरत ते भिवंडी दरम्यान अनेक रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. वसई शहरातील सिसीटीव्हीत चोरटा सुभान पोलिसांना दिसून आला. त्याचा माग काढत  पोलिसांनी त्याला भायखळा येऊन अटक केली. त्याला रेल्वे न्यायालयात हजर केले. रेल्वे न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी दरम्यान पोलिसांना त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबूली दिली. तसेच अन्य तीन गुन्ह्यातील मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले.

पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे आणि पोलिस उपायुक्त सचिन कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश चौगूले, पोलिस कर्मचारी राजेंद्र दिवटे, जर्नादन पुळेकर, रंजित रासकर, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता वसावे, महिंद्र कर्डिले, अजित माने, अजिम इनामदार आणि सोनाली पाटील यांच्या पोलिस पथकाने सुभान अहमदला शोधून काढले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस