शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर तब्बल 8 महिने 80 नराधमांनी केला बलात्कार; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:06 IST

Crime News : 13 वर्षांच्या मुलीवर आठ महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घडली. पीडित मुलीला जबदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आलं होतं.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर 80 जणांकडून तब्बल 8 महिने बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तेलंगणामध्ये 13 वर्षांच्या मुलीवर आठ महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घडली. पीडित मुलीला जबदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आलं होतं. पोलिसांना गुंटूर येथून या मुलीची सुटका केली आहे. 

पोलिसांनी अधिक तपास केला असता आठ महिन्यांत तब्बल 80 जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सर्व 80 नराधमांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी 10 जणांना अटक केली असून यामध्ये एका बी.टेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अजून काही आरोपी यामध्ये सामील असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित मुलीला सवर्ण कुमारी या महिलेने दत्तक घेतले होते, जिने जून 2021 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान रुग्णालयात तिच्या आईशी मैत्री केली होती. 

मुलीच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आणि त्यानंतर ही महिला मुलीच्या वडिलांच्या नकळत मुलीला सोबत घेऊन आली होती. ऑगस्ट 2021 मध्ये मुलीच्या वडिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी मुख्य आरोपी महिला सवर्ण कुमारीची ओळख पटवली. या प्रकरणी पहिली अटक जानेवारीमध्ये करण्यात आली होती आणि मंगळवारी, 19 एप्रिल रोजी गुंटूर पश्चिम विभाग पोलिसांनी बीटेकच्या विद्यार्थ्यासह आणखी 10 जणांना अटक केली. आरोपी आणि पीडितेची चौकशी केल्यावर पोलिसांना पीडितेच्या स्थितीतील वेदनादायक आणि धक्कादायक वास्तव समोर आले. 

गेल्या आठ महिन्यांपासून एका 13 वर्षीय मुलीला आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी पाठवले जात होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक के सुप्रजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 80 आरोपींपैकी 35 दलाल आहेत आणि बाकीचे ग्राहक आहेत. एएसपीने खुलासा केला की, "मुलीच्या वयाचा आणि स्थितीचा फायदा घेऊन, अनेक टोळ्यांनी मुलीला विकत घेतले आणि विविध ठिकाणी नेले आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी