शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: अकोला पोलिसांकडून अमरावतीत चोरीच्या आरोपीवर फायर, संशयकल्लोळ उठल्याने डीआयजींनी आरंभली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 23:09 IST

Crime News: अकोला पोलिसांनी अमरावतीत येऊन एका आरोपीवर दोन राऊंड फायर केले. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा थरार घडला.

अमरावती -  अकोला पोलिसांनी अमरावतीत येऊन एका आरोपीवर दोन राऊंड फायर केले. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा थरार घडला. याप्रकरणी अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी रात्री १०.१८ च्या सुमारास नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेश राऊत (३१, गजानननगर, डाबकी रोड, अकोला) व पवन काळे (१९, गायत्रीनगर, जुने अकोला) यांना अटक केली.

दरम्यान, हा सर्व घटनाक्रम संशयास्पद वाटल्याने अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे मंगळवारी अमरावती डीआयजी कार्यालयात पोहोचले. सोबतच अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनादेखील पाचारण करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, आरोपी राजेश राऊत याच्यावर अकोल्याच्या डाबकी रोड ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, तो अमरावतीच्या लक्ष्मीनगरात असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले हे पोलीस पथकासह सोमवारी लक्ष्मीनगरात पोहोचले. त्यावेळी आरोपी राजेश राऊत हा पवन काळे याच्यासह चारचाकी वाहनात दिसून आला. पोलीस दिसताच तो पळून जाण्याच्या बेतात होता. थांबण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे वाहन ढोले व पोलीस चमूच्या अंगावर आणले. दरम्यान, राजेश राऊतचे नियंत्रण सुटून वाहन विजेच्या खांबाला धडकले. पुढे ढोले यांनी स्वत:ची ओळख सांगून त्याला शरण येण्यास सांगितले.

 हा घटनाक्रम संशयास्पदआरोपी राजेश राऊत हा कारबाहेर आला. त्याने आपल्या तथा सहकाऱ्यांवर देशी कट्टा रोखला. तो पिस्टलमधून फायर करण्याच्या सवयीचा असल्याने आपण त्याच्या वाहनाच्या दिशेने दोन राऊंड फायर केले व त्याला ताब्यात घेतल्याचे ढोले यांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपीकडून गावठी पिस्टल व दोन काडतूस ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, सोमवारी सकाळी आरोपींकडून पोलिसांवर फायर झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, घटनेच्या १२ तासांनंतर नोंदविलेल्या तक्रारीत आरोपीने देशी कट्टा रोखल्याचे ढोले यांनी म्हटले आहे. वेळ नसल्याने आपण अमरावती शहर पोलिसांची मदत घेतली नसल्याचे स्पष्टीकरणदेखील देण्यात आल्याने संशय बळावला आहे. अकोल्याच्या अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत या सोमवारी रात्रीच गाडगेनगर पोलीस ठाण्यात डेरेदाखल झाल्या होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला