शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

"तू माझा झाला नाहीस तर मी तुला कोणाचाच होऊ देणार नाही"; 'तिने' तरुणावर फेकलं अ‍ॅसिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:09 IST

एका तरुणाने लग्नास नकार दिला म्हणून त्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीने त्याच्यावर थेट अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणींवर आणि महिलांवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याच्या घटना याआधी अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र हरियाणाच्या सोनीपतमध्ये याच्या अगदी उलट घटना घडली आहे. एका तरुणाने लग्नास नकार दिला म्हणून त्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीने त्याच्यावर थेट अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "तू माझा झाला नाहीस, तर मी तुला कोणाचाच होऊ देणार नाही" असं म्हणत तरुणीने त्याच्यावर पाच लीटर अ‍ॅसिड टाकलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम सिंह असं अ‍ॅसिड हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. श्याम सिंह झज्जर जिल्ह्याच्या बहादूरगडचा रहिवासी आहे. तो अनाथ आहे. सोनीपूतच्या मयूर विहारमध्ये श्याम सिंह त्याच्या आत्यासोबत राहतो. श्याम एका कंपनीत काम असल्याचं त्याची आत्या अनिता यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी श्यामची मैत्री गोहाना गावात राहणाऱ्या एका तरुणीशी झाली. तिने श्यामचा नंबर मिळवला आणि रोज त्याच्याशी संवाद साधू लागली.

काही दिवसांतच तरुणी तिच्या आईला घेऊन श्यामच्या आत्येच्या घरी पोहोचली. तिच्याकडून श्यामला लग्नासाठी मागणी घालण्यात आली. श्यामने थोडा वेळ मागितला. तरुणी विवाहित असून ती पतीपासून वेगळी राहत असल्याचं श्यामला समजलं. त्यामुळे त्याने लग्न करण्यास नकार दिला. नकार ऐकून ती संतापली. श्यामला वारंवार फोन करून त्रास देऊ लागली. तू माझा झाला नाहीस, तर मी तुला कोणाचाच होऊ देणार नाही, असं तिने श्यामला सांगितलं.

श्यामच्या आत्याने त्याला तरुणीचा नंबर ब्लॉक करण्यास सांगितलं. श्यामने नंबर ब्लॉक केल्यावर ती आणखी संतापली. 26 ऑक्टोबरला श्याम दूध आणण्यासाठी बाहेर गेला होता. तिथे तरुणी अ‍ॅसिडची 5 लीटरची बाटली घेऊन पोहोचली. श्यामला काही कळण्याआधी तिने त्याच्यावर संपूर्ण बाटली ओतली. श्यामचे हात, पाय, तोंड, कंबर गंभीररित्या भाजले. श्यामच्या नातेवाईकांना याबद्दल समजताच ते घटनास्थळी धावले. त्यांनी श्यामला रुग्णालयात दाखल केलं. श्यामची अवस्था गंभीर आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी