शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: अबब! आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 12:18 IST

Fake Note: बनावट नोटा घेऊन आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट ५ ने गायमुख येथे सापळा रचून शुक्रवारी अटक केली आहे.

ठाणे : बनावट नोटा घेऊन आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट ५ ने गायमुख येथे सापळा रचून शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हजार रुपये चलनाच्या आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा त्यांनी ज्यांच्याकडून घेतल्या त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.राम शर्मा (वय ५२, रा. विरार) व राजेंद्र राऊत (५८, रा. कुरगाव, पालघर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मदन चौहान (रा. पालघर) यांच्याकडून या नोटा आणल्याचे तपासात उघड झाले आहे. काहीजण बनावट नोटा चलनात आणण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती कासारवडली पोलिसांना मिळाली होती. 

दोन हजाराच्या नोटांची ४०० बंडले ताब्यात एका कारमधून दोघे तेथे आले असता, मोठ्या शिताफीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्या बनावट असल्याचे तपासात उघड झाले. त्यांच्याकडून दोन हजाराच्या नोटांची ४०० बंडले ताब्यात घेण्यात आली, ज्याची किंमत आठ कोटी रुपये एवढी आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात आला. 

पालघरमध्ये छापल्या नोटा चौहान व इतर साथीदारांच्या मदतीने त्यांच्या पालघर येथील कंपनीच्या कार्यालयात या नोटा छापल्या असल्याचे शर्मा, राऊत यांनी चौकशीत सांगितले. तसेच या नोटा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचेही कबूल केले. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी