शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: सातव्या मजल्यावरील घरात प्रवेश करत साडेबारा लाखांची घरफोडी, गोरेगावमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 08:19 IST

Crime News: ‘स्पायडरमॅन’सारखे इमारतीवर चढून एका चोराने सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून प्रवेश करत ग्राफिक डिझायरच्या घरातील साडेबारा लाखांच्या ऐवजावर हातसाफ केल्याची घटना सोमवारी घडली आहे.

- मनीषा म्हात्रे मुंबई :  ‘स्पायडरमॅन’सारखे इमारतीवर चढून एका चोराने सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून प्रवेश करत ग्राफिक डिझायरच्या घरातील साडेबारा लाखांच्या ऐवजावर हातसाफ केल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून बांगुरनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.गोरेगाव येथील पोलोरेज टॉवरच्या सातव्या मजल्यावर ही फिल्मी स्टाईल घरफोडी झाली आहे. ग्राफिक डिझायनर असलेल्या रितू मानधना (२७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. मानधना यांच्या तक्रारीनुसार, २९ जानेवारी रोजी घर लॉक करून गावी गेलेले हे दाम्पत्य सोमवारी दुपारी घरी परतले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतून लॉक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बाहेरून लॉक उघडणाऱ्याला बोलावून दरवाजा उघडला.  घरात प्रवेश करताच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले. तसेच बेडरूममधील कपाटातून दागिने चोरी झाले होते. अखेर मानधना यांनी बांगुरनगर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली. सोन्याचे हिरेजडित २० ते २५ तोळे दागिने, दीड लाख किमतीची महागडी घड्याळे, दोन लाखांची रोकड तसेच प्रोजेक्टरसह साडेबारा लाखांचा ऐवज यात चोरीला गेला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरूबांगुरनगर पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवत इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याचे बांगुरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई