शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

Crime News: अल्पवयीन मुलीवर हात बांधून अत्याचार, काल्हेरमधील घटना, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 09:16 IST

Crime News: ठाण्यातील एका खासगी क्लासच्या दहावीतील विद्यार्थिनीवर भिवंडीतील काल्हेर भागात एका खाेलीत हात बांधून सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडली.

 ठाणे : ठाण्यातील एका खासगी क्लासच्या दहावीतील विद्यार्थिनीवर भिवंडीतील काल्हेर भागात एका खाेलीत हात बांधून सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडली. तिला मारहाण आणि चावा घेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी पहाटे ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी छोटे-मोठे इव्हेंट करतात. इन्स्टाग्रामवर त्यांची ठाण्यातील १६ वर्षीय मुलीशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत एक जण २६ ऑगस्टला दुपारी तिच्या खासगी क्लासच्या ठिकाणी तिला घेण्यासाठी आला तेथून तिला काल्हेर येथील दुर्गेश पार्क सोसायटीतील एका इमारतीतील खाेलीवर घेऊन गेला. तिथे दुपारी २ ते सायंकाळी ४ या कालावधीत तिघांनी बेडरूमध्ये तिच्यावर लैैंगिक अत्याचार केले. तिने विरोध केला असता दाेन आराेपींनी तिला मारहाण केली, तर दुसऱ्याने तिचा चावा घेतला तसेच याबाबत काेणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. त्यानंतर काल्हेर येथून तिला ठाण्यातील घरी आणून साेडले.

चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल   या प्रकारामुळे तिला त्रास होऊ लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर तिने २७ ऑगस्टला रात्री चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार २८ ऑगस्टला सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग केला आहे. दरम्यान, शनिवारी पीडित मुलगी तक्रार देण्यासाठी चितळसर पोलीस ठाण्यात आली. त्याच वेळी पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड आणि  चितळसरच्या पोलीस निरीक्षक सुलभा पाटील आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

आराेपींना दिले नारपाेली पाेलिसांच्या ताब्यातवरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने रविवारी पहाटे दाेघांना ठाण्यातून, तर एकाला काल्हेरमधून अटक केली. त्यांना नारपाेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पीडित मुलीवर एका सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी