शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

Crime News: ३० वर्षीय महिलेचे ४ वृद्धांसोबत होते अनैतिक संबंध, मग झाली पाचव्याची एंट्री, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 14:49 IST

Crime News: बिहारमधील नालंदा येथून प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधांचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. नालंदा येथे एका वृद्धाला या प्रेमप्रकरणाची किंमत जीव गमावून मोजावी लागली आहे.

पाटणा - बिहारमधील नालंदा येथून प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधांचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. नालंदा येथे एका वृद्धाला या प्रेमप्रकरणाची किंमत जीव गमावून मोजावी लागली आहे. एका २० वर्षीय विधवा महिलेने चार वृद्ध प्रियकरांसोबत मिळून पाचव्या प्रियकराची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी जेव्हा या प्रकरणात या कथित प्रेमिकेला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा या प्रकरणाचा भांडाफोड झाला. तसेच त्याबाबत ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. 

हा धक्कादायक प्रकार अस्थावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलवापूर गावामध्ये घडला आहे. इथे एक ३० वर्षीय विधवा महिला चहाचं दुकान चालवते. तिचे चार वृद्धांसोबत अनैतिक संबंध होते. यादरम्यान, या प्रेमकहाणीमध्ये तृपित शर्मा (७०) या पाचव्या वृद्धाची एंट्री झाली. त्यानंतर जे काही घडते ते धक्कादायक होते. या तृपित शर्माने इतर वृद्धांप्रमाणेच या महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. 

या प्रकारामुळे या महिलेचे आधीचे कथित प्रियकर नाराज झाले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या सर्वांनी सदर महिलेसोबत मिळून पाचव्या प्रियकराची हत्या करण्याची योजना आखली. या महिलेने चार जणांसोबत मिळून शर्मा याला १९ ऑक्टोबर रोजी एका निर्मनुष्य भागात बोलावले. त्यानंतर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. तसेच त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये फेकला. तसेच मृताची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने विद्रुप करण्यात आला.  त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृताच्या मुलाने पोलिसांमध्ये तक्रार दिली. 

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यामध्ये मृत नेहमी चहाच्या टपरीवर नेहमी बसायचा. अशी माहिती समोर आली. मृताचा मोबाईल स्वीच ऑफ येत होता. मात्र महिनाभरानंतर मोबाईल स्वीच ऑन करताच तो आधीच सर्विलान्सवर टाकलेला असल्याने त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हा मोबाईल संशयित महिलेकडून जप्त केला. तसेच तिची कसून चौकशी केली. त्यामध्ये तिने आपण चार वृद्धांसोबत मिळून या व्यक्तीची हत्या केल्याचे मान्य केले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार