शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! 6 मुलांच्या आईवर एकतर्फी प्रेमातून रस्त्यात चाकूने वार; थरारक घटनेचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 14:56 IST

Crime News : महिलेने एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या तरुणाशी लग्न करण्यास नकार दिला होता, हे ऐकून तरुण आणखीन बिथरला. महिलेचा पाठलाग करत त्याने शुक्रवारी भरदिवसा तिच्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केलं.

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सहा मुलांची आई असलेल्य़ा एका महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने हल्ला केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. शुक्रवारी रस्त्याच्या मधोमध तरुणाने महिलेवर वार केले आहेत. IANS या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातली माहिती दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

महिलेने एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या तरुणाशी लग्न करण्यास नकार दिला होता, हे ऐकून तरुण आणखीन बिथरला. महिलेचा पाठलाग करत त्याने शुक्रवारी भरदिवसा तिच्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केलं. जुने शहरातील हाफिज बाबा नगर येथील वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर 48 वर्षीय महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या व्यक्तीच्या शोधात पोलीस व्यस्त आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

कंचनबाग पोलीस ठाण्याच्या निरीक्षक उमा महेश्वरा राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज बाबा नगरमध्ये एका व्यक्तीने एका महिलेवर अनेक वेळा चाकूने वार करताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या महिलेने त्या व्यक्तीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने हा हल्ला करण्यात आला. आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सध्या धोक्याबाहेर असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत.

या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण बुरखा घालून महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे, अचानक तो महिलेवर मागून लांब चाकूने हल्ला करताना दिसत आहे. महिला जखमी होऊन खाली पडल्यानंतरही तो थांबत नाही आणि एका व्यक्तीने जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने त्याच्यावरही चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. 

जखमी महिला ही सहा मुलांची आई असून, तिचा शेजारी अनेक वर्षांपासून तिला त्रास देत होता आणि तिच्या मागे लागला होता, असे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. गेल्या वर्षी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी त्याला अटक करून नंतर सोडून दिल्याचे सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी