शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पाडेगाव येथे ३० वर्षीय तरुणाची अज्ञाताकडून गळा चिरून हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 13:37 IST

पाडेगाव तालुका फलटण येथे घराबाहेर झोपलेल्या तीस वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

पाडेगाव तालुका फलटण येथे घराबाहेर झोपलेल्या तीस वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाडेगाव तालुका फलटण येथील शिवाचा मळा याठिकाणी राहणारा राहुल नारायण मोहिते हा युवक रात्री आपल्या घरासमोर झोपला होता. त्यावेळी अज्ञाताने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून हत्या केली.

राहुलचा गळा धारदार शस्त्राने चिरल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. यानंतर लोणंद पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून राहुल मोहिते याची हत्या कोणत्या कारणासाठी झाला याचा तपास करण्याचे काम सुरू आहे. 

राहुल ट्रक व्यवसाय करीत होता. त्याच्या कुटुंबात आई, वडील एक भाऊ दोन बहीणी आहेत. तो आपल्या कुटुंबीयांसहीतच राहत होता. सर्पमित्र म्हणूनही त्याची या भागात ओळख होती. पूर्व वैमन्यासातून त्याची हत्या केली गेली असावी अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानं यापूर्वी रात्रीच्या सुमारास आपल्या भावास फोन केला होता. काल त्याने गावच्या यात्रेनिमित्त अनेक मित्रांना फोन करून आमंत्रणही दिले होते. मात्र सकाळी साडे सहा वाजता आई पाणी तापविण्यासाठी उठली असता ही घटना उघडकीस आली. 

घटनास्थळी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी भेट दिली असून श्वान पथकही दाखल झाले आहे. पुढील तपासाच्या सूचना त्यांनी लोणंद पोलिसांना दिल्या तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी